• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why back pain rising in youth physiotherapy exercise will be solution asc

तरुणांमध्ये पाठदुखीची समस्या का वाढतेय? ‘या’ उपायांनी मिळेल आराम

बैठी जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, नियमित व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे पाठदुखीच्या समस्येत वाढ होतेय.

June 24, 2025 16:36 IST
Follow Us
  • Back Pain main
    1/9

    पाठदुखीची समस्या पन्नाशीनंतर वाढत जाणे ही आजकालची सामान्य स्थिती आहे. मात्र, काही तरुणांमध्ये वयाच्या १८ व्या वर्षीच त्याची सुरुवात होत असल्याचे अलीकडच्या काही वर्षांमध्ये निदर्शनास आले आहे. (PC : Freepik)

  • 2/9

    हल्ली पाठदुखी वाढण्याचं कारण काय?
    बैठी जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, नियमित व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे पाठदुखीच्या समस्येत वाढ होत असल्याची निरीक्षणे वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवली आहेत.(PC : Freepik)

  • 3/9

    मुंबईस्थित अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील रोबोटिक स्पाइन सर्जन डॉ. कुणाल भारद्वाज म्हणाले “पूर्वी आमच्याकडे पन्नाशीनंतरचे रुग्ण उपचारांसाठी येत होते. आता पाठदुखीचे तरुण रुग्ण देखील पाहायला मिळत आहेत, ज्यांना गंभीर पाठदुखी असते”. (PC : Freepik)

  • 4/9

    सध्या १८-६५ वयोगटातील व्यक्तींमध्ये पाठदुखीच्या समस्येत झपाट्यान वाढ होत आहे. मात्र, यावर वेळीच उपचार केल्यास भविष्यातील गुंतागुंत टाळता येते. (PC : Freepik)

  • 5/9

    ८० ते ९० टक्के पाठदुखीने त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज नसून योग्य औषधोपचार व फिजिओथरपी तसेच व्यायामाने बरे होता येते ,असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. (PC : Freepik)

  • 6/9

    नवी मुंबईतील ६० वर्षीय रुग्ण रुकिया बानू या १० वर्षांहून अधिक काळ पाठदुखीने ग्रस्त होत्या. वाढत्या त्रासानंतरही तिने डॉक्टरांकडे जाणे टाळले अखेर, तिच्या दोन्ही पायांना वेदना होऊ लागल्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली असता त्यांनी तिचे योग्य समुपदेशन केले व त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया केली. आज रुकिया आधाराशिवाय चालू शकते. (PC : Freepik)

  • 7/9

    पूर्वी हा प्रश्न पन्नाशीनंतर निर्माण व्हायचा. आता तरुणांमध्ये पाठदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक डॉ. विलास साळवे यांनी सांगितले. (PC : Pixabay)

  • 8/9

    मुंबईतील एक पन्नाशीची स्त्रीरुग्ण पाठदुखीच्या तीव्र वेदनेमुळे अडीच वर्षांपासून चालू शकत नव्हती. तिचा उजवा पाय सुन्न पडला होता आणि चालताना तिचा तोल जात असे. डॉक्टरांचा सल्ला घ्यायची पण भीतीमुळे शस्त्रक्रिया करणे टाळत होती. शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये उपचारांकरिता दाखल करण्यात आले, जिथे तिची सखोल तपासणी करून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती रुग्ण अगदी दुसऱ्याच दिवशी कोणत्याही आधाराशिवाय चालू लागली. (PC : Pixabay)

  • 9/9

    तुम्हाला देखील पाठदुखीचा त्रास होऊ लागला की, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या व उपचारांना सुरुवात करा, असे ठाण्यातील डॉ. जयेश नाईक यांनी सांगितले. (PC : Pixabay)

TOPICS
आरोग्य सेवाHealth Servicesहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Why back pain rising in youth physiotherapy exercise will be solution asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.