-
दीर्घायुष्य आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे? हे प्रत्येक व्यक्तीला जाणून घेण्याची इच्छा असते. दीर्घायुष्य जगण्यासाठी निरोगी जीवनशैली, सकस आहार, नियमित व्यायाम या गोष्टी तज्ज्ञांच्या मते महत्वाच्या असतात.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
आता मलेशियाचे माजी पंतप्रधान डॉ. महाथिर मुहम्मद यांनी १०० वर्षांच्या वयात त्यांच्या दीर्घायुष्याबाबत त्यांच्या काही सवयी एका मुलाखतीत बोलताना सांगितल्या आहेत.(फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
मलेशियाचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले डॉ. महाथिर मोहम्मद हे नुकतेच (१० जुलै २०२५) १०० वर्षांचे झाले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनातील काही सवयी सांगितल्या आहेत. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं : “तुम्हाला निरोगी आणि आनंदी राहायचं असेल तर शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं महत्वाचं आहे. तुमच्या दिनचर्या ठरवा आणि त्याचं पालन करा”, असं डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं. (फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
मनाचाही व्यायाम आवश्यक : “जर तुम्ही तुमच्या मेंदूचा वापर केला नाही, तुम्ही गोष्टी विसरायला लागतात. त्यामुळे मी नेहमी वाचतो, मी लिहितो. मी लोकांशी बोलतो. मी व्याख्याने देतो”, असंही डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
शिस्तप्रिय असावं : “माणसांनी आयुष्यात शिस्तप्रिय असलं पाहिजे. स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, नियम पाळले पाहिजेत आणि आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे”, असंही डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
वाईट सवयी टाळा : “धूम्रपान किंवा मद्यपानाच्या सवयी टाळल्या पाहिजेत. नेहमी संतुलित आणि पोष्टीक आहार घेतला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे”, असंही डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
सतत नवनवीन गोष्टी शिकलं पाहिजे : “सतत नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. मी अजूनही तरुण पिढ्यांशी संवाद साधत असतो. त्यांचे अनुभव शेअर करतो, असं डॉ. महाथिर मोहम्मद हे सांगतात.(फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
-
दोन ओपन-हार्ट सर्जरी, तरीही तंदुरुस्त : डॉ. महाथिर मोहम्मद यांनी म्हटलं की, त्यांना दोन हृदयविकाराचे झटके आले आणि दोन ओपन-हार्ट सर्जरी झाल्या. तरीही पूर्ण जोमाने कामावर परतलो, पण खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष दिलं, असं त्यांनी सांगितलं. (फोटो -प्रातिनिधीक छायाचित्र)
100 Years Life : दीर्घायुष्य आनंदी कसं जगायचं? निरोगी आयुष्याचं रहस्य काय? मलेशियाच्या माजी पंतप्रधानांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
दीर्घायुष्य आनंदी राहण्यासाठी काय केलं पाहिजे? दीर्घायुष्य जगण्यासाठी निरोगी जीवनशैली, सकस आहार, नियमित व्यायाम या गोष्टी तज्ज्ञांच्या मते महत्वाच्या असतात.
Web Title: How to live a long and happy life what is the secret to a healthy life these are the tips given by the former prime minister of malaysia gkt