-
अनेकदा, रोजच्या कामांमध्ये आणि सवयींमध्ये केलेले छोटे बदल शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यांसारख्या सोप्या उपायांनी तुम्हाला शांत आणि तणावमुक्त वाटू शकते. (Photo: Canva)
-
शरीराची हालचाल करा: सायकलिंग, चालणे किंवा योगा यासारखे नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होण्यास आणि मूड सुधारण्यास मदत होऊ शकते. (Photo: Canva)
-
स्क्रीन टाइम मर्यादित करा: टीव्ही, फोनवर घालवत असलेला वेळ मर्यादित करा. यामुळे झोप सुधारेल आणि तणाव देखील कमी होईल. (Photo: Canva)
-
लिहून ठेवा: जर्नल लिहिल्याने तुमचे मन मोकळे होण्यास मदत होते आणि भावना व्यक्त करण्यासाठी ते एक उत्तम मार्ग मानला जातो. (Photo: Canva)
-
कॅफिनचे कमी सेवन: जास्त कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्याने ताणतणाव वाढू शकतो आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो. (Photo: Canva)
-
संपूर्ण अन्न खा: ताज्या भाज्या, काजू, मासे आणि फळे मेंदूचे आरोग्य वाढवतात आणि तणाव संप्रेरकांना संतुलित ठेवतात. (Photo: Canva)
-
खोल श्वास घेण्याचा प्रयत्न करा: फक्त खोल श्वास घेण्याचा सराव करून हृदय गती कमी करता येते आणि मज्जासंस्था शांत करता येते. (Photo: Canva)
-
बाहेर वेळ घालवणे: फक्त बाहेर जाऊन निसर्गात किंवा उद्यानात १० मिनिटे घालवल्यानेही मूड सुधारू शकतो आणि मनाला आराम मिळू शकतो. (Photo: Canva)
-
संपर्कात रहा: एकाकीपणाची भावना कमी करण्यासाठी कुटुंब, मित्रांशी संपर्कात रहा त्यांच्यात सामील व्हा. (Photo: Canva)
-
स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्या : वाचन, छंद जोपासणे आणि स्ट्रेचिंग यासारख्या छोट्या छोट्या क्रियाकलापांमुळे स्वतःला रिचार्ज करता येते. (Photo: Canva)
-
सीमा निश्चित करा: तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि अनावश्यक दबाव कमी करण्यासाठी गरज पडल्यास “नाही” म्हणण्याचाही प्रयत्न करा. (Photo: Canva) हेही पाहा- भारतात कोणतं AI App सर्वात लोकप्रिय आहे? ChatGPT कितव्या स्थानी?
तणावमुक्त राहण्यासाठी दैनंदिन जीवनात ‘या’ सोप्या १० गोष्टींवर काम करा…
तणाव ही अशी गोष्ट आहे, जी प्रत्येकाला कधी ना कधी अनुभवायला मिळते, पण त्यावर नियंत्रित करण्यासाठी नेहमीच क्लिष्ट उपायांची गरज नसते. अनेकदा, रोजच्या कामांमध्ये आणि सवयींमध्ये केलेले छोटे बदल शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात.
Web Title: 10 simple lifestyle hacks to beat stress in marathi spl 93