• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. change these 6 habits if you feel sleepy during day iehd import asc

तुम्हालाही दिवसा झोप येते? वर्गात-ऑफिसमध्ये कंटाळा येतो? मग ‘या’ सहा सवयी बदला

काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला दुपारी झोप येते. त्यामुळे अशा सवयी बदलणं गरजेचं आहे.

August 27, 2025 16:40 IST
Follow Us
  • health, breakfast
    1/6

    नाश्ता वगळणे
    सकाळचा नाश्ता सर्वा महत्त्वाचा असतो. हा नाश्ता वगळल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर थकलेले राहता. तुमचं कामात लक्ष लागत नाही. प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सयुक्त नाश्ता करणं गरजेचं असतं. (Source: Photo by unsplash)

  • 2/6

    जास्त स्क्रीन टाइम (अत्याधिक स्क्रीनकडे पाहणे)
    जास्त स्क्रीन टाइम, विशेषतः झोपण्यापूर्वी स्क्रीनवर अधिक वेळ घालवणं खूप घातक आहे, जे तुमच्या circadian rhythm मध्ये (आपलं शरिराचं दिवसभराचं नैसर्गिक घड्याळ) व्यत्यय आणतं. उपकरणांमधून येणारा निळा प्रकाश मेलाटोनिनचे प्रमाण कमी करतो, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि दिवसभर झोप येणे किंवा आळस जाणवणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. (Source: Photo by unsplash)

  • 3/6

    शारीरिक हालचालीचा अभाव
    बसून राहण्याची जीवनशैली शरीर आणि मनाला सुस्त बनवते. दररोज थोडं चालल्याने किंवा हलकं स्ट्रेचिंग केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटतं. यामुळे झोपही सुधारते. (Source: Photo by unsplash)

  • 4/6

    पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)
    पुरेसं पाणी न पिल्याने थकवा, डोकेदुखी आणि लक्ष केंद्रित न होण्यासारख्या समस्या उद्भवतात. शरीर हायड्रेटेड ठेवणं ऊर्जा आणि एकाग्रता टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे. (Source: Photo by unsplash)

  • 5/6

    Overloading on Caffeine (जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन)
    कॅफीन तात्पुरती ऊर्जा देऊ शकते, पण नंतर थकवा वाढणे आणि ऊर्जा कमी होण्याची समस्या निर्माण होते. कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सवर जास्त अवलंबून राहिल्याने शरीराची नैसर्गिक ऊर्जा, आपलं संतुलन आणि झोपेची लय (sleep cycle) बिघडते. (Source: Photo by unsplash)

  • 6/6

    अयोग्य झोपेची सवय
    झोपेच्या अनियमित वेळा शरीराच्या जैविक घड्याळाला गोंधळात टाकते. दररोज वेगवेगळ्या वेळी झोपणं आणि उठणं यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. (Source: Photo by unsplash)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Change these 6 habits if you feel sleepy during day iehd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.