Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 9 powerful tips to strengthen mental health and fight anxiety in marathi spl

एंग्झायटीवर मात करण्यासाठी जीवनात ‘हे’ बदल करणं महत्वाचं आहे; चिंता-ताण संपेल व सकारात्मकता वाढेल…

हल्ली आपल्या जीवनात विविध स्वरूपात तणावाचं अस्तित्व नेहमी असतं. कामातला तणाव, नात्यांमधला बिघाड ते आर्थिक किंवा आरोग्यसंबंधी समस्या या गोष्टींनी माणससाला एंग्झायटीचा (चिंताग्रस्त) त्रास सुरू होतो.

August 28, 2025 19:14 IST
Follow Us
  • 9 powerful tips to strengthen mental health and fight anxiety
    1/12

    हल्ली आपल्या जीवनात विविध स्वरूपात तणावाचं अस्तित्व नेहमी असतं. कामातला तणाव, नात्यांमधला बिघाड ते आर्थिक किंवा आरोग्यसंबंधी समस्या या गोष्टींनी माणससाला एंग्झायटीचा (चिंताग्रस्त) त्रास सुरू होतो. (Photo Source: Pexels)

  • 2/12

    थोडीशी चिंता असणे सामान्य आहे कारण ती आपल्याला धोका टाळण्यास आणि सतर्क राहण्यास मदत करते. पण जेव्हा आपले मन आणि शरीर कोणताही खरा धोका नसतानाही ‘FIght Or Flight’ अशा स्थितीत जाते, तेव्हा त्याचा आपल्या आरोग्यावर आणि जीवनावर परिणाम होऊ लागतो. (Photo Source: Pexels)

  • 3/12

    चिंतेची लक्षणे
    चिंतेदरम्यान, एखाद्या व्यक्तीला हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे आणि हात-पाय थरथरणे, एकाग्रतेचा अभाव आणि वारंवार नकारात्मक विचार येणे, किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, अस्वस्थता, चिडचिड यासारख्या अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या येऊ शकतात. जर ही लक्षणे वेळीच नियंत्रित केली गेली नाहीत तर ती दीर्घकालीन मानसिक ताण निर्माण करू शकतात. (Photo Source: Pexels)

  • 4/12

    चिंता कमी करण्यासाठी ९ सोप्या टिप्स
    योग्य माहिती गोळा करा

    कधीकधी गैरसमज किंवा अपूर्ण माहितीमुळे आपली चिंता, अस्वस्थता आणि भीती वाढते. विश्वसनीय स्त्रोतांकडून अचूक माहिती मिळवून तुम्ही तुमची चिंता कमी करू शकता. योग्य माहिती आपल्याला समस्या समजून घेण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास मदत करते. (Photo Source: Pexels)

  • 5/12

    एक नवीन दिनचर्या तयार करा
    संतुलित आणि व्यवस्थित दिनचर्या मानसिक शांती देते. सकाळी आरामात चहा किंवा कॉफी पिणे, डायरी लिहिणे, पुस्तक वाचणे किंवा एखादा प्रकल्प पूर्ण करणे – या सर्व लहान पावलांमुळे चिंता कमी होऊ शकते. (Photo Source: Pexels)

  • 6/12

    संपर्कात रहा
    मित्र आणि कुटुंबाशी गप्पा मारणे, लहान मिटिंग्स करणे किंवा गरजू व्यक्तीला मदत करणे आपल्याला आतून मजबूत बनवते. माणसांमध्ये मिसळून राहणे हा चिंता कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. (Photo Source: Pexels)

  • 7/12

    स्वतःची काळजी घेण्याला महत्त्व द्या
    . दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. चांगली झोप घ्या, निरोगी आहार घ्या, तुमचे आवडते संगीत ऐका किंवा गरम पाण्याने आंघोळ करून आराम करा. या छोट्या सवयी ताण कमी करतात आणि शरीराला आराम देतात. (Photo Source: Pexels)

  • 8/12

    सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा.
    आयुष्यात चांगला आणि वाईट काळ दोन्ही एकत्र प्रवास करत असतात. लहान गोष्टीतला आनंद जगून घेण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञ राहणं शिका त्याने मन हलके होते आणि नकारात्मक विचार कमी होतात. (Photo Source: Pexels)

  • 9/12

    नियमित व्यायाम करा
    व्यायामामुळे आपल्या मेंदूमधून एंडोर्फिन नावाचे रसायन बाहेर पडते, ज्यामुळे आपल्याला बरे वाटते. चालणे असो, धावणे असो, योगा असो किंवा नृत्य असो – नियमित शारीरिक हालचालींमुळे चिंता बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होते. (Photo Source: Pexels)

  • 10/12

    ध्यान आणि सजगता
    ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि खोल श्वासोच्छ्वास यासारखे योग खूप प्रभावी आहेत. त्यांना तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा. (Photo Source: Pexels)

  • 11/12

    आत्मपरीक्षण करा
    आयुष्यात तुमच्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. तुमचा विश्वास, अध्यात्म आणि जीवनातील उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञता व्यक्त करणे मानसिक संतुलनासाठी देखील खूप फायदेशीर आहे. (Photo Source: Pexels)

  • 12/12

    मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका.
    जर चिंता खूप वाढत असेल तर गप्प बसू नका. मित्र, कुटुंब किंवा डॉक्टरांशी बोला. तुमचं ज्यांच्याशी पटतं त्यांच्या गटांमध्ये सामील व्हा. बोलण्याने ओझे कमी होते आणि मानसिकरीत्या हलकं वाटतं. (Photo Source: Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्थ बेनिफीट्सHealth Benefits

Web Title: 9 powerful tips to strengthen mental health and fight anxiety in marathi spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.