-
तुम्हाला गॅस किंवा पोटफुगीचा त्रास आहे का? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही तुम्हाला काही सोप्या योगासनांच्या मदतीने गॅसच्या समस्येपासून कशी सुटका मिळवायची याबाबत काही टिप्स देणार आहोत. (Photo Source : Unsplash)
-
बलासन (Child’s Pose) : गुडघ्यांवर बसून हात समोर ताणा. हे आसन पोटफुगीपासून आराम देतं. (Photo Source : Unsplash)
-
मलासन (Garland Pose): स्क्वाट पोजिशनमध्ये बसा आणि गुडघे दोन्ही बाजूला ताणून बसण्याचा प्रयत्न करा. यामुळे पोटावर दाब येतो. परिणामी पचन सुधारतं, गॅस सोडण्यास मदत होते. दररोज हे आसन केल्याने सकाळी पोटही साफ होतं. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील हे आस करण्याचा सल्ला देते. (Photo Source : Unsplash)
-
मार्जरासन-बितीलासन (Cat Cow Stretch): चित्रात दाखवल्याप्रमाणे आसन करा, यामुळे रक्ताभिसरण व पचन प्रक्रिया सुधारते. (Photo Source : Unsplash)
-
पवनमुक्तासन (Wind-Relieving Pose): पाठीवर झोपा, हातांनी पकडून गुडघे छातीजवळ घ्या. हे आसन केल्याने पोटात अडकलेला गॅस बाहेर सोडता येतो. (Photo Source : Unsplash)
-
सेतुबंधासन (Bridge Pose): पाठीवर झोपा, दोन्ही हात जमिनीवर ठेवा, त्यानंतर कंबर जितकी उंच उचलून धरता येईल आणि शरीर स्थिर ठेवता येईल तितका प्रयत्न करा. हे आसन कोअर मजबूत करते आणि पचनक्रिया सुधारते. (Photo Source : Unsplash)
-
त्रिकोणासन (Triangle Pose): उभे राहून, एक हात पायाच्या दिशेने आणि दुसरा हात उंच करून ताणून धरा, यामुळे पोटात अडकलेला गॅस मुक्त होतो. (Photo Source : Unsplash)
कुठल्याही औषधाशिवाय गॅस व पोटफुगीपासून मुक्ती हवीय, करा ‘ही’ सहा सोपी योगासनं
काही सोप्या योगासनांच्या मदतीने गॅसच्या समस्येपासून कशी सुटका मिळवायची याबाबत काही टिप्स देणार आहोत.
Web Title: 6 yoga poses to relieve form gas and bloating iehd import asc