-

फिटनेसच्या बाबतीत लोकांचे काही गैरसमज असतात. त्यातून ते व्यायाम करताना किंवा फिटनेस मेन्टेन ठेवताना चुका करतात. आज आम्ही तुम्हाला असे काही सामान्य गैरसमज सांगणार आहोत जे तुम्हाला चांगलं व बळकट शरीर कमावण्यापासून रोखत असतील. (PC : Unsplash)
-
गैरसमज : वजन कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कार्डिओ
सत्य : कार्डिओने थोडाफार फायदा होतो, मात्र स्ट्रेंथ ट्रेनिंग नवे स्नायू तयार करते, स्नायू अधिक मजबूत करते, चयापचय वाढवते आणि विश्रांती घेत असतानाही जास्त कॅलरीज बर्न करते. ज्यामुळे वजन झपाट्याने कमी करता येतं आणि त्याचा फिटनेस राखण्यास फायदा होतो. (PC : Unsplash) -
गैरसमज: तुम्हाला जिममध्ये तासनतास घालवावे लागतात
सत्य : अगदी २० ते ३० मिनिटे जरी व्यायाम केला तरी तो तितकाच प्रभावी ठरतो. फक्त हा व्यायाम करताना जिममध्ये टंगळमंगळ न करता, मोठे ब्रेक न घेता केंद्रीत वर्काउट करावं. (PC : Unsplash) -
गैरसमज : वजन उचलल्याने तुम्ही बल्की (धिप्पाड) बनता
सत्य : बहुतेक लोक बल्की बॉडी बनवण्यासाठी पुरेसं टेस्टोस्टेरॉन तयार करत नाहीत. परंतु, वेटलिफ्टिंगमुळे ताकद मिळते आणि शरीर अधिक बळकट होण्यास मदत होते. (PC : Unsplash) -
गैरसमज : No Pain, No Gain (वेदना नाही तर फायदा नाही)
सत्य: वेदना हे प्रगतीचे एकमेव लक्षण नाही. योग्य प्रशिक्षणाने तुम्ही बळकट शरीर कमावू शकता. त्यासाठी वेदना होईपर्यंत किंवा दुखापत होईपर्यंत व्यायाम करायची किंवा चुकीचे व्यायाम करण्याची गरज नाही. ‘नो पेन नो गेन’ याचा खरा अर्थ मेहनत केल्याशिवाय, कष्टाशिवाय तुमचं शरीर बळकट होऊ शकत नाही असा आहे. मात्र काही जण याचा शब्दशः अर्थ घेतात, ज्याने त्यांचं नुकसान होतं. (PC : Unsplash) -
गैरसमज: Spot Reduction Works
सत्य : आधी स्पॉट रिडक्शन काय आहे ते समजून घेऊया. स्पॉट रिडक्शन म्हणजे एका विशिष्ट स्नायूसाठीचा व्यायाम करणे, किंवा एखाद्या विशिष्ट भागातील चरबी कमी करण्यासाठी केवळ त्या अवयवाशी संबंधित व्यायाम करणे. परंतु, ते फारसं फायद्याचं ठरत नाही. म्हणजेच केवळ क्रंचेस करून तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकत नाही. चरबी कमी करण्यासाठी संपूर्ण शरिराचा व्यायाम व योग्य आहार घ्यावा लागतो. त्यानंतरच तुम्हाला चरबी कमी करता येईल. (PC : Unsplash) -
गैरसमज : जास्त घाम आला म्हणजे चांगला व्यायाम झाला.
सत्य : प्रत्येक वेळी भरपूर घाम आला म्हणजे चांगला व्यायाम झाला किंवा त्यातून भरपूर कॅलरी बर्न झाल्या असं नसतं. ऋतू कोणता आहे, बाहेरचं आणि जिममधलं वातावरण कसं आहे त्यावरही या गोष्टी अवलंबून असतात. (PC : Unsplash)
फिटनेस व व्यायामाबद्दलचे ‘हे’ गैरसमज तुम्हाला बळकट शरीर कमावण्यापासून रोखतायत!
आम्ही आज तुम्हाला फिटनेस व व्यायामाबद्दलचे असे काही सामान्य गैरसमज सांगणार आहोत जे तुम्हाला चांगलं व बळकट शरीर कमावण्यापासून रोखत असतील.
Web Title: Common fitness myths stops you from fitness annd good physique iehd import asc