-

नाश्त्यामध्ये (स्नॅक्स) अनेक भारतीय पदार्थांचे उत्तम आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही आज तुम्हाला असे सहा पदार्थ सांगणार आहोत, जे झटपट तयार होतील, चवीला चांगले आहेत आणि पौष्टिकही आहेत. (Photo Source: Unsplash)
-
कुरमुऱ्यांची भेळ : कुरकुरीत आणि कमी कॅलरीचा नाश्ता जो भाज्या आणि मसाल्यांबरोबर मिक्स केलेला असतो. संध्याकाळच्या भुकेसाठी हलकासा पण समाधानकारक आणि तितकाच चविष्ट असा पर्याय आहे. (Photo Source: Unsplash)
-
ढोकळा : हा स्टीम केलेला गुजराती स्नॅक संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. हलका, प्रोबायोटिकयुक्त आणि पचायला सोपा असा पदार्थ लहान मुलं देखील आवडीने खातात.(Photo Source: Unsplash)
-
इडली : हा स्टीम केलेला दक्षिण भारतातील कमी कॅलरीयुक्त असा पदार्थ जो सकाळी आणि संध्याकाळी, कुठल्याही वेळच्या नाश्त्यासाठी बनवता येईल. हा पदार्थ पचनास सोपा आणि सांबारसोबत खाल्ला तर प्रोटीनही मिळतं. (Photo Source: Unsplash)
-
पोहे : हलका आणि लोहयुक्त पदार्थ जो बहुतेक वेळा भाज्या आणि शेंगदाण्यांसह बनवला जातो, सकस न्याहारीसाठी उत्तम पर्याय आहे. (Photo Source: Unsplash)
-
भाजलेले चणे : प्रोटीन आणि फायबरने भरलेला हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. भाजलेले चणे पोट भरून ठेवतात आणि कधीही खाण्यासाठी परफेक्ट स्नॅक आहे. (Photo Source: Unsplash)
-
मोड आलेल्या मुगाचं चाट (Sprouted Moong Chaat) : जीवनसत्त्वे, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला हा पदार्थ नाश्त्यासाठी योग्य आहे. हा चविष्ट आणि तितकाच पोषणमूल्यांनी भरलेला नाश्ता आहे. (Photo Source: Unsplash)
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारे सहा चविष्ट पदार्थ, भरपूर प्रोटीन मिळेल अन् पचायलाही सोपे
आम्ही आज तुम्हाला असे सहा पदार्थ सांगणार आहोत, जे झटपट तयार होतील, चवीला चांगले आहेत आणि पौष्टिकही आहेत.
Web Title: 6 indian snacks are actually good for health quick to make iehd import asc