-
आज आपण लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मदत करणारे 6 पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊयात…
-
बीट: हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी ओळखले जाणारे बीट हे नैसर्गिक रक्त तयार करते. तसेच चांगले रक्ताभिसरण करण्यासही मदत करते.
-
गूळ: लोहाने समृद्ध असा नॅचरल गोड पदार्थ, गूळ अशक्तपणा रोखण्यासही मदत करतो आणि तो मिष्टान्नांमध्ये साखरेसाठी एक उत्तम पर्याय आहे.
-
मसूर: मसूर डाळ लोहाचा सर्वोत्तम शाकाहारी स्रोत आहे. सूप, भाजी किंवा भिजवून खाण्यासाठी उत्तम.
-
भोपळ्याच्या बिया: या कुरकुरीत बियांमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते.
-
मांस: मांसाहारी लोकांसाठी मांसाहार हा लोह मिळवण्याचा एक उत्कृष्ट स्रोत आहे.
-
पालक: लोहाचा एक जबरदस्त स्त्रोत , पालक व्हिटॅमिन सी देखील प्रदान करते. हेही पाहा- Photos: देहरादूनमध्ये भयंकर जलप्रलय! अख्खं मंदिर पाण्याखाली, रस्ते-वाहनांचं प्रचंड नुकसान, पूराचे भयावह फोटो व्हायरल
निरोगी ह्रदयासाठी लोह खूप महत्वाचे आहे, लोहाची कमतरता ‘अशी’ भरून काढा…
लोह कमी असल्यास शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवते, ज्यामुळे थकवा येतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात, त्यामुळे लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी काही पदार्थ खाणं गरजेचं आहे…
Web Title: 6 foods that can help you with iron deficiency marathi info spl