-
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्याच्या सेवनाने अनेक समस्यांचा धोका कमी करता येतो. (Photo: Pexels)
-
दरम्यान, पेरूचे जितके फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत. विशेषतः या चार प्रकारच्या लोकांना पेरू खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. (Photo: Freepik)
-
१- पोट फुगी
पेरूमध्ये फ्रुक्टोज (नैसर्गिक साखर) आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. अनेक लोकांचे शरीर फ्रुक्टोजला पचवू शकत नाही किंवा जर जास्त व्हिटॅमिन सी असेल तर त्यामुळे गॅस, पोट फुगणे किंवा जडपणा येऊ शकतो. अशा लोकांनी झोपण्यापूर्वी पेरू खाणे टाळावे. (Photo: Freepik) -
२- मधुमेह
पेरू खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. पण हे नुकसान कारक देखील ठरु शकते. पेरूत ग्लायसेमिक कमी असल्यान हळूहळू त्यातली साखर रक्तात जाते, पेरु जास्त प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी अचानक वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांना दिवसातून १-२ लहान पेरू खाण्याचा सल्ला दिला जातो. (Photo: Pexels) -
३- पचनाच्या समस्या
पेरूमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील दोन्ही प्रकारचे तंतू असतात जे पचनक्रिया सुधारतात, परंतु अतिसंवेदनशील आतडे असलेल्या लोकांना पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. (Photo: Freepik) -
४- त्वचेची संवेदनशीलता
संवेदनशील त्वचा किंवा एक्झिमा असलेल्या लोकांना पेरू खाल्ल्याने त्वचेत जळजळ, लालसरपणा किंवा खाज सुटण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांना त्वचेची समस्या आहे त्यांनी पेरू खाऊ नये. (Photo: Freepik) -
५- दातदुखी
ज्या लोकांना दातदुखीची समस्या आहे त्यांनी जास्त पेरू खाणे टाळावे. असे केल्याने दातदुखी वाढू शकते. (Photo: Pexels) हेही पाहा- निरोगी ह्रदयासाठी लोह खूप महत्वाचे आहे, लोहाची कमतरता ‘अशी’ भरून काढा…
‘अशा’ व्यक्तींनी पेरु खाण्याचा मोह टाळला पाहिजे, आरोग्य समस्या वाढू शकतात…
Who should not eat guava: पेरू अनेक समस्यांमध्ये फायदेशीर आहे परंतु काही लोकांना त्याचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो, असे का? चला जाणून घेऊ…
Web Title: These five types of people should not eat guava know its side effects and risks spl