-

हल्ली आपण खूपदा बाहेरुन खरेदी केलेला पनीर खातो. पण असे करणे आरोग्याच्या दृष्टिने हानिकारक ठरु शकते, बाहेरचा पनीर खाण्याचे काही तोटे जाणून घेऊयात. (Photo: Unsplash)
-
अस्वच्छ ठिकाणी बनवलेला पनीर बॅक्टेरिया दूषित असण्याची शक्यता असते. त्यामुळे तो खाल्ल्यास विषबाधा किंवा संसर्ग होऊ शकतो. (Photo: Unsplash)
-
अयोग्य पद्धतीने हाताळल्यास आणि साठवल्यास पनीर दूषित होतो. (Photo: Unsplash)
-
अनेक ठिकाणी विक्रेते भेसळ असलेले किंवा पाणी मिसळलेले दूध वापरुन पनीर बनवतात. त्यामुळे त्यातील पौष्टिक घटकांटचे नुकसान होते. याशिवाय असा पनीर खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. (Photo: Unsplash)
-
हॉटेलमधील पनीरमध्ये अनेकदा तेलाचं प्रमाण जास्त असतं, मलई आणि बटरही अधिक वापरले जाते. त्यामुळे पनीर खाणं हानिकारक बनतं. (Photo: Unsplash)
-
मॉल्समध्ये पनीर जास्त काळ टिकावा यासाठी केमिकल संरक्षक वापरले जातात. जे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचवू शकतात. (Photo: Unsplash)
-
अधिक काळ बनवून ठेवलेले पनीर फ्रीजरमधून बाहेर काढताच खूप लवकर खराब होते. त्यामुळे असा पनीर खाल्ल्यास त्यापासून गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात. (Photo: Unsplash)
-
काही ठिकाणी पनीर कमी खर्चात तयार व्हावा यासाठी दूध पावडर, स्टार्च वापरले जातात. जे पचनासाठी हानिकारक असतात. त्याचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात. (Photo: Unsplash)
-
त्यामुळे घरीच ताजे पनीर बनवून खाणे कधीही योग्य. (Photo: Unsplash)
हेही पाहा- Clove Tea Benefits: जेवणानंतर लवंग घातलेला चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे…
सावधान! बाहेरून आणलेला पनीर खाण्याचे ‘हे’ धोके माहितीयेत का?
तुम्हीही बाहेरचा पनीर खाताय? ‘या’ काही गोष्टींमुळे तुम्ही घरीच ताजा पनीर बनवून खाणं योग्य आहे…
Web Title: Risks of eating paneer from outside marathi info spl