-
ब्रोकोली या भाजीचा सुपरफूड म्हणून जगभर प्रचार केला जातो. त्यानुसार काही प्रमाणात या भाजीचे आरोग्यासाठी फायदे नक्कीच आहेत. मात्र, अशा काही भारतीय भाज्या आहेत ज्या आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांच्या बाबतीत ब्रोकोलीला टक्कर देऊ शकतात. तसेच चवीला ब्रोकोलीपेक्षा चांगल्या आहेत. (Photo Source unsplash)
-
बथुआ
बथुआ, ज्याला पिगवीड किंवा लॅम्ब्स क्वार्टर्स असंही म्हटलं जातं, ही एक हिवाळी हिरवी भाजी आहे. उत्तर भारतात ही लोकप्रिय भाजी आहे. पौष्टीकतेच्या बाबतीत या भाजीची ब्रोकोलीशी तुलना होऊ शकते. -
बथुआची भाजी कशी बनवली जाते?
बथुआ साधारणपणे पराठ्यात, कोशिंबीर, साग, सूप्समध्ये वापरली जाते किंवा स्मूदीमध्ये मिसळून या भाजीचं सेवन करता येतं. -
प्रोटीन आणि फायबरने भरपूर अशी भाजी
बथुआ मध्ये वनस्पती-आधारित प्रथिने (प्लान्ट बेस्ड प्रोटीन), फायबर्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स भरपूर असतात, ज्यामुळे पचनसंस्था आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी ही भाजी उत्कृष्ट ठरते. -
व्हिटॅमिन्सचा खजिना : ब्रोकोलीसारखीच, बथुआ देखील व्हिटॅमिन A, C आणि B-कॉम्प्लेक्सने समृद्ध आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेसाठी आणि चयापचयासाठी ही भाजी उपयोगी आहे.
-
वजन कमी करण्यासाठी आणि डिटॉक्ससाठी उत्कृष्ट
बथुआ नैसर्गिकपणे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करते, यकृताचं आरोग्य सुधारते. या भाजीमधील उच्च फायबर सामग्री तुम्हाला अधिक वेळपर्यंत तृप्त ठेवते, जे वजन नियंत्रणासाठी उत्तम आहे. म्हणजेच ही भाजी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही. -
सुपरफूड
मुख्यतः हिवाळ्यात उपलब्ध असलेली बथुआ ही भाजी उत्तर भारतात सहजपणे मिळते आणि आयात केल्या जाणाऱ्या ब्रोकोलीच्या तुलनेत ती परवडणारी आणि स्थानिक पर्याय म्हणून उत्तम आहे.(Photo Source unsplash)
‘ही’ भारतीय भाजी दे ब्रोकोलीला टक्कर, स्वस्त व पौष्टीक भाजी हिवाळ्यात सगळीकडे मिळते
अशा काही भारतीय भाज्या आहेत ज्या आरोग्याला मिळणाऱ्या फायद्यांच्या बाबतीत ब्रोकोलीला टक्कर देऊ शकतात. तसेच चवीला ब्रोकोलीपेक्षा चांगल्या आहेत.
Web Title: Bathua and indian version of broccoli protein rich vegetable iehd import