-
चांगल्या आणि पुरेशा झोपेसाठी अॅक्युप्रेशर उपचाराचा अवलंब केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तसेच झोपेशी संबंधित अनेक समस्या सुधारू शकतात.(Photo Source by Unsplash)
-
मानेच्या दोन्ही बाजू : आपल्या मानेच्या दोन्ही बाजूने प्रेशर पॉइंट्साला हलक्या हातांनी हळूवारपणे मसाच केल्याने ताण, थकवा आणि मानसिक ताण कमी होऊ शकतो. (Photo Source by Unsplash)
-
हँड व्हॅली पॉइंट : तुमच्या हाताच्या बोटामधील अंगठा आणि बोटांमधील भागावर दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने हलका मसाज केल्यास आराम मिळतो.(Photo Source by Unsplash)
-
मनगटाच्या आतील भाग: मनगटाच्या आतील भागामध्ये हलका मसाज केल्यास चिंता, मळमळ कमी करते, मज्जासंस्था शांत करते.(Photo Source by Unsplash)
-
सोलर प्लेक्सस पॉइंट : नाभीच्या अगदी वर आणि हृदयाच्या मध्यभागी हलकासा मसाज केल्यास श्वासोच्छवासाचे नियमन करण्यास मदत करते, ताण कमी करते आणि शांतता जाणवते. (Photo Source by Unsplash)
-
तुमच्या डोक्याच्या दोन्ही बाजू : डोक्याच्या दोन्ही बाजूला हलकासा मसाज केल्यास तणाव आणि डोकेदुखी कमी होते आणि आराम मिळतो.(Photo Source by Unsplash)
-
भुवयांच्या मध्ये : तुमच्या भुवयांच्या मध्ये, नाकाच्या अगदी वर हलकासा मसाज केल्यास मन शांत होण्यास मदत होते, ताण कमी होण्यास मदत होते आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते. (Photo Source by Unsplash)
Pressure Points : तुम्हाला शांत झोप हवीय का? चिंता कमी करायचीये? मग ‘हे’ सहा प्रेशर पॉइंट्स जाणून घ्या!
Pressure Points : जर तुम्हाला तुमची चिंता शांत करण्यात अडचण येत असेल तर हे सहा अॅक्युप्रेशर पॉइंट्स त्वरित आराम देतात.
Web Title: Do you want a peaceful sleep want to reduce anxiety instantly then learn these six pressure points gkt