-
Cough Syrup Row: बदलत्या हवामानामुळे लहान मुलांना सर्दी खोकला होण्याचे प्रमाण अधिक असते. सर्रासपणे पालक मुलांना सर्दी खोकला झाल्यानंतर कफ सिरप देतात. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात डेक्सट्रोमेथोर्फन आणि डायथिलीन ग्लायकॉल असलेल्या कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाला.
-
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये घडलेल्या घटनांनी कफ सिरपच्या धोक्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एका महिन्यात नऊ मुलांचा किडनी फेल्युअरमुळे मृत्यू झाला.
-
या मृत्यूंच्यामागे ‘कफ सिरपचा वापर’ हा संभाव्य कारणीभूत घटक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे, राजस्थानातील सीकर जिल्ह्यात एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून त्याला Dextromethorphan या कफ सिरपमधील घटकावर आधारित औषध दिल्याचा आरोप आहे. शिवाय आणखी २ मुलांच्या मृत्युमागे हेच कारण असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
यानंतर औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.ज्यामुळे मुलांसाठी कफ सिरप निवडतानादेखील पालकांना काळजीपूर्वक निवडावी लागेल. त्यामुळे यापुढे पालकांनी सावध राहून ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा आणि मुलांना चुकूनही देऊ नका.
-
छिंदवाडा कलेक्टर शीलेंद्र सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरपमधील डायएथिलीन ग्लायकॉल हे रसायन कारणीभूत असल्याची शक्यता आहे. यामुळे कोल्ड्रिफ आणि नेक्सट्रॉस डीएस या दोन कफ सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
-
ज्या खोकल्याचा औषधामुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी रात्री त्याचे रिपोर्ट प्राप्त झाले. रिपोर्टनुसार खोकल्याच्या औषधीमध्ये डायएथिलीन ग्लाईकोलचे प्रमाण ४८.६ टक्के इतके आहे. त्यामुळे आरोग्याला धोका असतो.
-
खोकल्याच्या औषधामुळे विषबाधा होऊन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकरणामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणी आता महाराष्ट्र सरकारने लहान बालकांच्या आरोग्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे.
-
राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून या प्रकरणीची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून टोल फ्री नंबर सुरू करण्यात आला आहे.
-
कोल्ड्रिप सिरप हे मे २०२५ ते एप्रिल २०१७ या कालावधीतील औषध मेडिकलमध्ये असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांकवर माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
Coldrif Cough Syrup Row: ज्यामुळे मुलांसाठी कफ सिरप निवडतानादेखील पालकांना काळजीपूर्वक निवडावी लागेल. त्यामुळे यापुढे पालकांनी सावध राहून ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा आणि मुलांना चुकूनही देऊ नका.
Web Title: Cough syrup news 12 kids deaths linked to toxic cough syrup in rajasthan mp due to kidney failure note syrup names immediately srk