-

फास्ट फूडसह अनेक पदार्थ खाल्ल्यानंतर यकृतामध्ये विषारी पदार्थ जमा होतात, जे त्याचे नुकसान करू शकतात. यकृत स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैली आवश्यक आहे. (PC : Unsplash)
-
यकृताचे कार्य
रक्तातील अमीनो आम्लांचे नियमन करणे, ग्लुकोजची पातळी संतुलित करणे, ग्लुकोजचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करणे, शरिरातील विषारी पदार्थ काढून टाकणे ही यकृताची कामं आहेत. परंतु, यकृत निरोगी नसेल तर त्याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. मात्र काही आयुर्वेदिक उपाय करून यकृत स्वच्छ किंवा शुद्ध करता येतं. तसेच हे उपाय मूत्रपिंडाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकतात.(PC : Unsplash -
मेथी-त्रिफळा : यकृतातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी त्रिफळा, मेथीचे दाणे आणि कडुलिंबाची पाने या सगळ्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय, यकृत स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात कारले आणि पालक खाण्याची शिफारस केली आहे. (PC : Unsplash)
-
हळद : रात्री झोपण्यापूर्वी हळद मिसळलेलं दूध प्यायल्याने यकृतातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन आढळते जे यकृताला विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. याशिवाय जिरे घातलेलं पाणी देखील उपयुक्त आहे, जिऱ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे यकृताला विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यास मदत करतात. जिरे टाकून पाणी उकळून घ्यावं आणि हे पाणी सकाळी प्यावं, असं केल्याने ते फायदेशीर ठरू शकते. (PC : Unsplash
-
पंचकर्म : आयुर्वेदात पंचकर्माचे मोठे स्थान आहे आणि हा यकृत शुद्ध करण्यासाठी एक प्रभावी उपचार आहे. त्यात मालिश, आंघोळ, शुद्धीकरण, नस्य आणि रक्त शुद्धीकरण प्रक्रियांचा समावेश आहे. (PC : Unsplash
-
लिंबू पाणी : लिंबू आणि कोमट पाणी हा यकृत स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे म्हटले जाते. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे यकृताला विषमुक्त करण्यास मदत करतात. सकाळी लिंबाचा रस मिसळलेलं कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.(PC : Unsplash
यकृत स्वच्छ करण्यासाठी पाच प्रभावी आयुर्वेदिक उपाय
यकृत स्वच्छ करण्यासाठी पेये | यकृत विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. पण जेव्हा याचा परिणाम होतो तेव्हा त्याचे परिणाम शरीराच्या अनेक भागांवर दिसून येतात. काही आयुर्वेदिक उपाय आहेत ज्यांच्या मदतीने यकृत स्वच्छ करता येते. येथे जाणून घ्या.
Web Title: Liver cleansing drinks ayurveda recommends ieghd import asc