-
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे.
-
आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत.
-
ठाणे जिल्ह्यातील सर्व आगार बंद आहेत.
-
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे.
-
यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.
-
आधीच करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद होत्या.
-
आता संपानंतर लॉकडाऊन पश्चात सुरू झालेली शहरी बससेवा देखील ठप्प झालीय.
-
अशा स्थितीत नागरिकांना प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
एसटी बससेवा ठप्प झाल्यानं याचा फायदा खासगी वाहतुकीला झालाय. मात्र, तेथे प्रवाशांची लूट होतानाही दिसत आहे.
-
त्यामुळे आता सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर काय पाऊल उलचलं यावरच हा संप मिटणार की आणखी चिघळणार हे ठरणार आहे.
-
दुसरीकडे हे प्रकरण न्यायालयातही गेलंय. त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेवरही या संपाचं भविष्य अवलंबून राहणार आहे.
Photos : राज्यातील एसटी संप चिघळला, २५० पैकी २२३ आगार बंद, सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.
Web Title: St bus employee protest during diwali festival result in passenger discomfort pbs