• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra is watching what happened to you sanjay raut retaliation against fadnavis abn

“आम्ही काय होतो ते माहिती आहे, तुम्ही काय झालात हे महाराष्ट्र बघतोय”; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

काय होतास तू काय झालास तू अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता

November 17, 2021 15:14 IST
Follow Us
  • शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे सातत्याने विरोधी पक्षांवर खोचक टीका करताना दिसून येतात. विरोधकांच्या टीकेला देखील अनेकदा शिवसेनेकडून संजय राऊत शेलक्या शब्दांमध्ये उत्तर देतात.
    1/15

    शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे सातत्याने विरोधी पक्षांवर खोचक टीका करताना दिसून येतात. विरोधकांच्या टीकेला देखील अनेकदा शिवसेनेकडून संजय राऊत शेलक्या शब्दांमध्ये उत्तर देतात.

  • 2/15

    मंगळवारी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • 3/15

    देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढत संजय राऊतांची खिल्ली उडवली.

  • 4/15

    काय होतास तू काय झालास तू अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

  • 5/15

    राऊत यांची अवस्था कोण होतास तू…काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू…अशी जळजळीत टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.

  • 6/15

    त्यावर खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना शेलक्या शब्दांमध्ये उत्तर दिले आहे.

  • 7/15

    देवेंद्र फडणवीसांकडे भरपूर वेळ असल्याचे जुनी गाणी ऐकत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

  • 8/15

    आम्ही काय होतो ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही काय झालात हे महाराष्ट्र बघतोय, असेही राऊत म्हणाले.

  • 9/15

    तुमची अवस्था अशीच राहिली तर तुम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागू शकते असे.

  • 10/15

    तशी अवस्था होऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो, असे संजय राऊत म्हणाले. (संग्रहित छायाचित्र । इंडियन एक्स्प्रेस)

  • 11/15

    त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेले मोर्चे म्हणजे षडयंत्र होते, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

  • 12/15

    नवाब मलिक यांना हे सगळं माहिती होतं, असा गंभीर आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला

  • 13/15

    महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट असल्याचेही फडणवीसांनी म्हटले होते.(फोटो सौजन्य- ट्विटर)

  • 14/15

    सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

  • 15/15

    एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Maharashtra is watching what happened to you sanjay raut retaliation against fadnavis abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.