• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut criticism on chandrakant patil abn

“पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे झाल्याने चंद्रकांत पाटलांना झटके बसत असावेत”; संजय राऊतांचा टोला

झोपेतून जागे व्हा एवढेच मी चंद्रकांत पाटलांना सांगू शकतो असे संजय राऊत म्हणाले.

November 23, 2021 17:17 IST
Follow Us
  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे म्हटले.
    1/12

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असे म्हटले.

  • 2/12

    एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांची एसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.(फोटो PTI)

  • 3/12

    एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असेही संजय राऊत म्हणाले.

  • 4/12

    गुढीपाढव्या पर्यंत राज्यात नविन सरकारची मुहूर्तमेढ रोवली जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

  • 5/12

    चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत २८ वेळा हे सरकार जाईल असे विधान केले आहे, असे राऊत म्हणाले.

  • 6/12

    चंद्रकांत पाटलांना बोलत राहू द्या. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांनी असे बोलणे गरजेचे आहे.

  • 7/12

    चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने हे सरकार जात नाही हे सर्वांना माहिती आहे. हे सरकार पुढचे २५ वर्षे टीकणार आहे.

  • 8/12

    पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होत आहेत म्हणून बहुतेक त्याचेच झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत असे राऊत म्हणाले

  • 9/12

    म्हणून ते सरकार पडेल असे म्हणत आहेत. झोपेतून जागे व्हा एवढेच मी चंद्रकांत पाटलांना सांगू शकतो असे संजय राऊत म्हणाले.

  • 10/12

    यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांची तब्बेत झपाटयाने सुधारत आहे, लवकरच ते कामाला रुजू होतील, असे राऊत म्हणाले.

  • 11/12


    पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी परमबीर प्रकरणावरही भाष्य केले. शरद पवारांसोबत परबमबीर सिंह प्रकरणाची चर्चा करावी तितका तो गंभीर विषय नाही, असे राऊत म्हणाले.

  • 12/12

    महाराष्ट्रासारखे सुरक्षित राज्य नाही, पोलीस प्रमुख असलेल्या व्यक्तीने मला धोका आहे असं म्हणणं हा विनोद आहे, अशी टीका त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर केली.

TOPICS
चंद्रकांत पाटीलChandrakant Patilभारतीय जनता पार्टीBJPसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut criticism on chandrakant patil abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.