Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of worlds longest skywalk in chikhaldara amravati melghat pbs

Photos: पाहा कसा असणार अमरावतीमधील जगातील सगळ्यात मोठा ‘स्कायवॉक’

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठा स्कायवॉक निर्माण होत आहे.

January 22, 2022 17:09 IST
Follow Us
  • महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठा स्कायवॉक निर्माण होत आहे.
    1/21

    महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे जगातील सर्वात मोठा स्कायवॉक निर्माण होत आहे.

  • 2/21

    चिखलदऱ्याच्या या स्कायवॉकचं बांधकाम सुरू असतानाच केंद्र सरकारच्या पातळीवर काही अडथळे आले.

  • 3/21

    याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली होती.

  • 4/21

    तसेच केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुराव्याची मागणी यशोमती ठाकूर यांनी केली होती.

  • 5/21

    त्यानुसार तात्काळ पाठपुरावा होऊन केंद्र सरकारची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्कायवॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 6/21

    केंद्राच्या परवानगीमुळे आता चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत.

  • 7/21

    जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे.

  • 8/21

    स्वीझरलँडचा स्कायवॉक ३९७ मीटर लांबीचा आहे.

  • 9/21

    चीनचा स्कायवॉक ३६० मीटर लांबीचा आहे.

  • 10/21

    मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे.

  • 11/21

    मात्र, चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत.

  • 12/21

    राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिलीय.

  • 13/21

    अमरावतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, “केंद्र सरकारने चिखलदरा येथील स्काय वॉकचे अडथळे काढून टाकले आहेत.”

  • 14/21

    याबाबत आम्हाला परिपत्रक मिळालं आहे, असंही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

  • 15/21

    २ दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्राच्या स्तरावरील अडथळे दूर करण्याचं आश्वासन दिलं होतं.

  • 16/21

    यानंतर आता केंद्र सरकारने यावर प्रतिसाद दिलाय.

  • 17/21

    अमरावतीत स्कायवॉक निर्माण करणं या जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा पर्यटनाचा भाग आहे.

  • 18/21

    अमरावतीतील या स्कायवॉकसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून पाठपुरावा होत आहे, असंही ठाकूर यांनी नमूद केलंय.

  • 19/21

    यशोमती ठाकूर यांनी या कामातील पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

  • 20/21

    एकूणच लवकरच अमरावतीत जगातील सर्वात लांब स्कायवॉक बांधून पूर्ण होईल असं चित्र आहे.

  • 21/21

    चिखलदऱ्याचा हा स्कायवॉक पूर्ण झाल्यानंतर अनेक पर्यटकांची अमरावतीकडे वळतील असं दिसतंय.

TOPICS
पर्यटनTourismमहाराष्ट्र पर्यटनMaharashtra Tourism

Web Title: Photos of worlds longest skywalk in chikhaldara amravati melghat pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.