• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sharad pawar meets pm modi raises issue of ed action against sanjary raut talk about mvm government scsg

Photos: “…तर महाविकास आघाडी सरकार अस्थिर होईल”; मोदींसोबतच्या भेटीनंतरच शरद पवारांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी केलं हे वक्तव्य

April 7, 2022 20:07 IST
Follow Us
  • Sharad Pawar meets PM Modi raises issue of ED action Against Sanjary Raut Talk About MVM Government
    1/21

    महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

  • 2/21

    प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचे पवार यांनी मोदींना सांगितल़े मोदी-पवार भेटीमुळे दिल्लीसह महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले होते.

  • 3/21

    मात्र, ‘राज्यातील सरकार भक्कम असून, आगामी विधानसभा निवडणुकीतही तिन्ही घटक पक्ष एकत्र लढतील’, असा निर्वाळा पवार यांनी दिला.

  • 4/21

    तरीही यावेळेस पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी जर तरच्या भाषेत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीबद्दल एक वक्तव्य केलं असून ते सध्या चर्चेत आहे.

  • 5/21

    शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांनी मोदी यांच्याशी ४० मिनिटे चर्चा केली होती.

  • 6/21

    त्यानंतर गेल्या वर्षी सहकार क्षेत्राशी निगडीत प्रश्नांसंबंधी पवारांनी मोदींची भेट घेतली होती. मात्र, राज्यातील ‘ईडी’च्या वेगवान कारवायांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले होत़े.

  • 7/21

    पंतप्रधानांच्या संसदेतील कार्यालयात २० मिनिटे त्यांनी मोदींशी चर्चा केली.

  • 8/21

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ‘ईडी’च्या कारवाईबद्दल पवार यांनी पत्रकार परिषदेत कमालीची नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मोदींच्या भेटीत उपस्थित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

  • 9/21

    संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्याची काय गरज होती? ते भाजपावर कठोर टीका करतात म्हणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची ईडीची कारवाई अन्यायकारक असल्याचे पवार म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीचे अलिबागमधील भूखंड व दादरमधील सदनिका ईडीने जप्त केली आहे.

  • 10/21

    राज्याच्या मंत्रिमंडळातील बदलांची चर्चा होत असली तरी, त्यावर पवारांनी स्पष्टपणे भाष्य करण्यास नकार दिला.

  • 11/21

    “हा मुद्दा मुंबईत घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चित होत असतो. मला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थिती माहिती असून पक्षात कोणतेही बदल केले जाणार नाहीत,” असे पवार म्हणाले.

  • 12/21

    काँग्रेसच्या आमदारांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कारभाराबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या असल्याच्या मुद्दयावर पवार म्हणाले की, “आघाडीतील एखादा पक्ष नाराज असेल तर हे सरकार अस्थिर होईल.”

  • 13/21

    “मात्र, आघाडीच्या बैठकांमध्ये तरी काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली नाही. तीनही पक्षांनी भाजपविरोधात लढण्याचा निर्धार केला असल्याने राज्य सरकारला कोणताही धोका नाही,” असे पवार म्हणाले.

  • 14/21

    यूपीएचे अध्यक्षपद सोनियांकडेच > संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदाची सातत्याने चर्चा होत असली तरी, ‘हे पद स्वीकारण्याची माझी तयारी नाही. ‘यूपीए’मध्ये असलेली विद्यमान व्यवस्थाच कायम राहिली पाहिजे’, असे पवार म्हणाले.

  • 15/21

    गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये पवारांनी ‘यूपीए’चे अध्यक्ष व्हावे, असा ठराव पवार यांच्या उपस्थितीत संमत केला होता.

  • 16/21

    मात्र, काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे ‘यूपीए’चे अध्यक्षपद कायम राहणार असल्याचे पवार यांनी सूचित केले. बिगरभाजप पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आग्रही असून त्यांच्याशी चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.

  • 17/21

    विधान परिषदेतील रिक्त जागांचा मुद्दा > ‘‘विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असून, हा मुद्दाही मोदींच्या कानावर घातला आहे. राज्य सरकारने या नियुक्त्यासंदर्भात राज्यपालांना पत्रे लिहिली आहेत. संभाव्य सदस्यांची यादीही दिली आहे. मात्र, हा प्रश्न निकाली काढला जात नाही, असा मुद्दा मोदींपुढे मांडला’’, असे पवार यांनी सांगितले.

  • 18/21

    बिगरभाजप पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आग्रही असून त्यांच्याशी चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.

  • 19/21

    ‘मलिक, देशमुखांबाबत चर्चा नाही’ > राज्यातील मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधातही ‘ईडी’ आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. या नेत्यांवरील कारवाईबद्दल विचारले असता, त्यांच्याबद्दल मोदींशी चर्चा केली नाही, असे पवार यांनी सांगितले.

  • 20/21

    पण, केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार असतील तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

  • 21/21

    पहिल्यांदाच पवार अशाप्रकारे एखाद्या नेत्याविरोधातील कारवाईच्या मुद्द्यावरुन थेट पंतप्रधानांना भेटलेत. (सर्व फाइल फोटो)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiशरद पवारSharad Pawarसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sharad pawar meets pm modi raises issue of ed action against sanjary raut talk about mvm government scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.