-
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा झाली या सभेत बोलताना फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल बीकेसीमधील सभेतून भाजपावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.(सर्व फोटो – अमित चक्रवर्ती)
-
या सभेची सुरूवात सामूहिक हनुमान चालीसा पठणाने झाली.
-
सभेसाठी आलेल्या नागरिकांना हनुमान चालीसा पठणासाठी छोटी पुस्तिका देखील देण्यात आली होती.
-
यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार मंगलप्रभात लोढा, कृपाशंकर सिंह उपस्थित होते.
-
सभेसाठी आलेल्या नागरिकांना भगव्या टोप्या देण्यात आल्या होत्या.
-
या सभेला महिलांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-
यावेळी हनुमान चालीसाच्या म्हणण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
-
फडणवीसांच्या भाषणा अगोदर आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांची भाषणं झाली.
-
विविध संघटनांच्यावतीने यावेळी देवेंद्र फडणीस यांचा सत्कारही करण्यात आला.
-
महाविकास आघाडी सरकारविरोधात लढण्यासाठी ताकदीने एकत्र या असे आवाहन करण्यात आले
-
सभेसाठी आलेले नागरीक देखील फडणवीसांच्या आवाहनास हात उंचावून प्रतिसाद देत होते.
-
याप्रसंगी देवेंद्र फडणवीसांना गदा देखील देण्यात आली.
-
“कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टरसभा मास्टरसभा पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं लाफ्टर सभा लाफ्टर सभा.” असं फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या सभेचं वर्णन केलं.
-
कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
-
आम्ही फाईव्हस्टारचं राजकारण नाही केलं, जमिनीवरचं राजकारण केलं आहे. असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
-
अरे मै तो अयोध्या जा रहा था, मै तो बाबरी गिरा रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिरची लगी तो मै क्या करू? असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सभेतूनच दिलं प्रत्युत्तर
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा पार पडली.
Web Title: Leader of opposition devendra fadnavis responds to cm uddhav thackerays criticism msr