Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. smriti irani faces protests by ncp congress over price rise during pune visit scsg

Photos: घोषणा, हाणामारी, अंड्यांची फेकाफेकी अन् NCP vs BJP; पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा आरोप प्रत्यारोपांचा सामना या प्रकरणावरुन सुरु झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे

May 17, 2022 17:51 IST
Follow Us
  • Smriti Irani faces protests by NCP Congress over price rise during Pune visit
    1/19

    पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातील राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागलं आहे. (सर्व फोटो आशिष काळे, इंडियन एक्सप्रेस)

  • 2/19

    स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली घोषणाबाजी केली.

  • त्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्या वैशाली नागवडे यांच्यावर हात उचलल्याच्या प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.
  • 3/19

    याप्रकरणी भाजपाच्या संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण नेमकं घडलं काय होतं हे अनेकांना माहिती नाही. या गॅलरीमध्ये फोटोंच्या माध्यमातून याच प्रकरणाच्या घटनाक्रमावर टाकलेली ही नजर…

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.
  • 4/19

    इराणी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या.

  • 5/19

    त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला.

  • 6/19

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

  • 7/19

    त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे.

  • 8/19

    सभागृहामधील भाजपा समर्थकांनी मारहाण केल्याचे आरोप केले जात असून यासंदर्भातील व्हिडीओही व्हायरल झालेत.

  • 9/19

    एकीकडे सभागृहामध्ये हा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

  • 10/19

    बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमापूर्वी स्मृती इराणी यांचा सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम होता.

  • 11/19

    त्यापूर्वी महागाईच्या मुद्दयावर इराणी यांनी बोलावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

  • 12/19

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

  • 13/19

    क्यू की गॅस भी कभी सस्ती थी असे फलक राष्ट्रवादीच्या महिलांनी हातात पकडले होते.

  • 14/19

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली जात होती.

  • 15/19

    इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.

  • 16/19

    सभागृहात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात राष्ट्रवादीकडून सोमवारी डेक्कन पोलीस स्थानकामध्ये तक्रारही दाखल करण्यात आली होती.

  • 17/19

    याच तक्रारीची दखल घेत डेक्कन पोलिसांनी भस्मराज तीकोने ( रा.कसबा पेठ ) , प्रमोद कोंढरे( रा. नातू बाग), मयूर गांधी (शुक्रवार पेठ,) या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केला आहे.

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPस्मृती इराणीSmriti Irani

Web Title: Smriti irani faces protests by ncp congress over price rise during pune visit scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.