-
पुणे मेट्रो प्रकल्पअंतर्गत भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या बारा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम शनिवारी पूर्ण झाले.
-
मेट्रो भुयारी मार्गाचा हा महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक टप्पा नियोजित वेळेत पूर्ण झाला आहे.
-
स्वारगेट येथून निघालेले पवना टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) भुयारी मार्ग पूर्ण करून बुधवार पेठ स्थानकात बाहेर पडले.
-
यानंतर या प्रकल्पामधील सर्व कामगारांनी भारतीय ध्वज फडकावत आनंद साजरा केला.
-
टीबीएमद्वारे भुयारी मार्गाचे एकूण १२ किमी चे काम पूर्ण झले आहे.
-
उर्वरित भूयारी मार्गात आता इतर काम पूर्ण केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.
-
यामध्ये प्रामुख्याने सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळांचे काम केलं जाणार आहे.
-
तसेच विद्युत व्यवस्था व इतर महत्वपूर्ण व्यवस्था बसवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.
-
१२ किलोमीटरच्या या बोगद्याचं काम पूर्ण झाल्याचा आनंद कामगारांच्या आणि तंत्रज्ञांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक