Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. heavy rainfall vidarbha maharashtra cm eknath shinde dcm devendra fadnavis visit gadchiroli district flood photos sdn

Photos: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व बैठका रद्द करुन पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी थेट गडचिरोलीला पोहोचले

विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत अतिवृष्टी तर १३ व १४ जुलैला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

July 12, 2022 10:36 IST
Follow Us
  • Eknath Shinde Devendra Fadnavis Vidarbha Gadchiroli Flood
    1/15

    उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात मोसमी पावसाचा जोर वाढला आहे.

  • 2/15

    अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २१ बळी गेले आहेत.

  • 3/15

    विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून हवामान खात्याने १२ जुलैपर्यंत अतिवृष्टी तर १३ व १४ जुलैला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

  • 4/15

    अनेक गावांना सतर्क करण्यात आले आहे. पूर्व विदर्भात एकूण १२ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

  • 5/15

    गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत.

  • 6/15

    यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर काही काळ थांबून त्यांनी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली.

  • 7/15

    जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक विशेष बैठक गडचिरोली जिल्हा नियोजन भवनात पार पडली.

  • 8/15

    दरवर्षी पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • 9/15

    तसेच अशा गावांबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

  • 10/15

    जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणीपातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

  • 11/15

    गेल्या तीन दिवसांपासूनू विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे.

  • 12/15

    विदर्भातील गोसेखुर्द आणि बेंबळा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  • 13/15

    येत्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक ठिकाणी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

  • 14/15

    पूरस्थिती आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाकडून राज्यातील आठ जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) १३ तुकड्या, तर राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एसडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

  • 15/15

    (सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस / ट्विटर)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeगडचिरोलीGadchiroliदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Heavy rainfall vidarbha maharashtra cm eknath shinde dcm devendra fadnavis visit gadchiroli district flood photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.