• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ajit pawar says i will call nitin gadkari scsg

“जनतेचा काय दोष? त्यांनी काय पाप केलंय?” असा संतप्त सवाल विचारत अजित पवार म्हणाले, “मी गडकरींनाच फोन करुन…”

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या पहाणी दौऱ्यावर आहेत.

July 28, 2022 14:26 IST
Follow Us
  • Ajit Pawar Says I will call nitin Gadkari
    1/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या पहाणी दौऱ्यावर आहेत. एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी पवार यांनी यावेळी केली आहे.

  • 2/15

    अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा, भामरागड आणि अहेरी भागातील गावांची पाहणी आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी एका प्रश्नासंदर्भात थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही उल्लेख केल्याचं पहायला मिळालं. मागील काही दिवसांपासून अजित पवार हे अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ते अहमदनगरमध्येही अशाच भागांना भेट देऊन त्या ठिकाणची पहाणी करुन आले.

  • 3/15

    अतिवृष्टीत जे नुकसान झाले आहे त्याची सगळी माहिती आपण घेतल्याचं पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करताना ज्या घरांना ओलावा आला आहे त्यांचाही समावेश करावा अशी विनंती अजित पवार यांनी सरकारला केली आहे. (फाइल फोटो १५ जुलै च्या अहमदनगर दौऱ्याचा)

  • 4/15

    साधारण या भागात दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे त्यामध्ये गडचिरोलीमध्ये २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. धान आणि पिकांवर शेतकऱ्यांचा संसार अवलंबून होता त्यासाठी त्याला वर्षभर जगण्याकरीता संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे साधारण पाऊणलाख हेक्टरी ज्यांचं पीक उध्वस्त झालं त्यांना तातडीने सरकारने मदत दिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

  • 5/15

    गडचिरोली जिल्हयात अतिवृष्टीमुळे दहा दिवस सुट्टी जाहीर झाली होती म्हणजे एवढे दिवस मोलमजुरी करणार्‍या लोकांना काहीच मिळणार नसेल तर त्यांनी जगायचं कसं हा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे, असेही अजित पवार म्हणाले.

  • 6/15

    त्यामुळे याचा साकल्याने विचार सरकारने केलाच पाहिजे आणि भरीव अशी मदत मग ती केंद्रसरकारकडून आणा किंवा राज्याकडून द्या, परंतु त्यांना मदत करा असेही सरकारला सांगितले आहे.

  • 7/15

    जिल्ह्यातील १२ तालुक्यापैकी अहेरी, सिरोंचा, भामरागड या भागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेले त्यांनी पंचनामे करायला सांगून दहा ते बारा दिवस झाले तरी सगळीकडील पंचनामे झालेले नाहीत. ज्या गावांना भेटी दिल्या त्या शेतकऱ्यांनी पंचनामे झाले नाहीत असे अजित पवारांनी सांगितले आहे.

  • 8/15

    आधारकार्ड व अर्ज फक्त घेतला आहे. परंतु पंचनामे केल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत कशी देणार आहात याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अजित पवार यांनी विचारणा केली.

  • 9/15

    १२ तालुक्यातील आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे जातील त्यानंतर ते विभागीय आयुक्त ( नागपूर ) तिथून मदत व पुनर्वसन विभाग मुंबईला आणि मग तिथे निर्णय होऊन त्यानंतर शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

  • 10/15

    आज शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची गरज आहे. तातडीने अधिवेशन घेण्याचीही गरज आहे. पावसाळी अधिवेशन व्हायला विलंब होतो आहे ही वस्तुस्थिती आहे. याकडे सगळा महाराष्ट्र बघतोय. कालपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व यामध्ये विलंब लावू नका असे सांगितले आहे. आम्ही दोघं बघतोय ना असे बोलले परंतु दोघांनी मुंबईतून बघणं आणि ३७ जिल्ह्यात मंत्री नेमून पालकमंत्री पद देणं, त्यांना तिथे बसून या यंत्रणांना कामाला लावायला लागणं यामध्ये खूप फरक पडतो असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

  • 11/15

    नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे खासदार, आमदार या सर्वांना एकत्र घेऊन काम केलं तर त्याचे रिझल्ट हे गतीने मिळायला सुरुवात होते. परंतु तसं दुर्दैवाने आज पहायला मिळत नाहीय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकरी तर खूप हवालदिल झाला आहे. त्यांना वीजेचे कनेक्शन मिळत नाहीय. पीक वाया गेले तर त्यावर पीक कर्ज घेऊ शकत नाही. त्याला पुन्हा बी किंवा रोपं दिली तरी ती रोपं सध्या सडली आहेत कुजली आहेत. असं अतोनात नुकसान झालं आहे असेही अजित पवार म्हणाले.

  • 12/15

    या भागाचे आमदार बाबाराव आत्राम आणि आमदार रोहित पवार हे व्हाया तेलंगणातून जावून या नुकसानीची पाहणी करून आले आहेत. एसटी बंद होती ती पुन्हा सुरु करा असेही प्रशासनाला सांगितले आहे. सिरोंचा ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्वरीत दुरुस्त करण्याची गरज आहे, असंही अजित पवार म्हणाले.

  • 13/15

    याबाबत विचारणा केली असता अधिकार्‍यांनी साडेपाच मीटरला परवानगी दिली आणि नॅशनल हायवे बोलते की, साडेसात मीटरला परवानगी दिल्याशिवाय आम्ही खड्डे बुजवू शकत नाही किंवा काम करु शकत नाही, असं उत्तर दिलं.

  • 14/15

    “म्हणजे साडेपाच आणि साडेसात या गोंधळामध्ये लोकांचा, जनतेचा काय दोष आहे. त्यांनी काय पाप केलंय?” असा सवालही अजित पवार यांनी सरकारला केला आहे.

  • दरम्यान. हा विषय नितीन गडकरी यांच्या कानावर घालून स्वतः लक्ष द्या म्हणून कॉल करणार आहे. वनविभागाने नाहरकत देण्याची गरज आहे त्यांनीही परवानगी दिली नसल्याने हा रस्ता रखडला आहे याबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
TOPICS
अजित पवारAjit Pawarएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisनितीन गडकरीNitin Gadkari

Web Title: Ajit pawar says i will call nitin gadkari scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.