• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra chief minister eknath shinde inauguration mohammadwadi garden in pune pramod bhangire photos sdn

Photos: ज्या कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते टीकेचे धनी, तीच वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही

राज्यात सत्तांतरानंतर महिन्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरही ही वेळ आली आहे.

August 2, 2022 10:27 IST
Follow Us
  • Eknath Shinde Pramod Bhangire Pune Garden
    1/20

    गेल्या वर्षी अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नरेंद्र मोदी स्टेडियम असे नामांतर करण्यात आल्याने पंतप्रधान टीकेचे धनी ठरले होते.

  • 2/20

    राज्यात सत्तांतरानंतर महिन्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरही ही वेळ आली आहे.

  • 3/20

    पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर शिंदे यांच्या नावाने उद्यान उभे राहिले असून, त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार होते पण, उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे.

  • 4/20

    महापालिकेच्या मुख्य सभेने केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवित शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरातील या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे.

  • 5/20

    त्यामुळे उद्यानाचे उद्घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्यता असून शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.

  • 6/20

    महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे.

  • 7/20

    या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत.

  • 8/20

    राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे.

  • 9/20

    मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांकडून त्यांच्या कुटुंबीयांची नावे उद्यानांना आणि अन्य वास्तूंना दिली जात आहेत.

  • 10/20

    गेल्या काही दिवसांपूर्वी गुलटेकडी भागातील सॅलिसबरी पार्क येथील उद्यानाला भाजपच्या नगरसेवकाने त्यांच्या वडिलांचे नाव दिले होते.

  • 11/20

    त्याविरोधात सॅलिसबरी पार्क कृती समितीने आक्षेप घेत त्याविरोधात लढा सुरू केला आहे.

  • 12/20

    ही घटना ताजी असतानाच शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरप्रमुख म्हणून नियुक्त केलेले माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरात उद्यान विकसित केले आहे.

  • 13/20

    या उद्यानाला त्यांनी एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे.

  • 14/20

    महापालिकेचा ठरावाला केराची टोपली दाखवत नाव देण्यात आले आहे.

  • 15/20

    आता या उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच होणार असल्याने त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

  • 16/20

    दरम्यान, उद्यान विकसित करण्यात आलेली जागा महापालिकेची आहे.

  • 17/20

    मात्र एका खासगी विकासकाकडून ते विकसित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

  • 18/20

    त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या हे उद्घाटन वादात सापडण्याची शक्यता आहे.

  • 19/20

    (सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे, नाना भानगिरे / ट्विटर)

  • 20/20

    (हेही पाहा : शिंदे गटातील त्या १२ खासदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं घडलंय काय)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeनरेंद्र मोदीNarendra Modiपुणे न्यूजPune Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Maharashtra chief minister eknath shinde inauguration mohammadwadi garden in pune pramod bhangire photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.