Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra assembly monsoon session 2022 shivsena vs shinde group over leadership in house scsg

Photos: गोंधळात गोंधळ… मुख्यमंत्रीही सेनेचा आणि विरोधी पक्षनेताही सेनेचाच कसा? १२ आमदार अन् भाजपाची ‘ती’ अडचण

भाजपा, शिवसेना आणि शिंदे गटाच्या या गोंधळामध्ये काँग्रेसला फायदा होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे

August 17, 2022 15:01 IST
Follow Us
  • maharashtra assembly monsoon session 2022 shivsena vs shinde group over leadership in house
    1/18

    राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी समाधानकारक नसताना अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीवर पडणारा बोजा, आमदारांना खूश करण्यासाठी होणारी निधीची खैरात, या पार्श्वभूमीवर सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरु झाले.

  • विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली असली तरी त्यावरूनही वाद होण्याची शक्यता आहे.
  • 2/18

    शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून ते मुख्यमंत्रीपदी आहेत.

  • 3/18

    अशा वेळी विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेलाच कसे देता येईल, असा कायदेशीर व तांत्रिक मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे.

  • 4/18

    भाजपा आणि शिंदे गटाकडून दानवे यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे.

  • 5/18

    विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त असून त्या जागी कोणाची निवड करायची, याबाबत भाजपामध्ये विचारविनिमय सुरू आहे.

  • 6/18

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली आहे.

  • 7/18

    विधान परिषदेतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, भाई गिरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदींचा समावेश आहे.

  • 8/18

    बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे.

  • 9/18

    दरेकर हे फडणवीस यांच्या विश्वासातील असून त्यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करण्यात आलेला नाही.

  • 10/18

    त्यामुळे राम शिंदे किंवा प्रवीण दरेकर यांच्यापैकी एकाची विधान परिषद सभापतीपदासाठी निवड होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

  • 11/18

    राज्यपाल नियुक्त १२ जागांवर नियुक्ती झाल्याशिवाय सभापतीपदाची निवडणूक घेतली जाणार नाही.

  • 12/18

    कारण १२ सदस्यांची भर पडली तरच भाजपाला सभापतीपद मिळू शकते.

  • 13/18

    विधान परिषदेत शिवसेनेचे १२ सदस्य असले तरी त्यापैकी तीन-चार सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

  • 14/18

    उपसभापतींनी विरोधी पक्षनेतेपदी दानवे यांची नियुक्ती केली असली तरी त्याची घोषणा सभागृहात होते.

  • 15/18

    मात्र यामध्ये काँग्रेसही शिंदे सरकारविरोधात विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 16/18

    काही आमदार शिंदे गटाकडे गेल्यावर शिवसेनेची सदस्यसंख्या कमी झाल्यास फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

  • 17/18

    अशा परिस्थितीत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केला जाऊ शकतो.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeकाँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Maharashtra assembly monsoon session 2022 shivsena vs shinde group over leadership in house scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.