-
राज्यात सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणाची चर्चा होत आहे.
-
अजित पवारांनी काल सभागृहातील भाषणात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला.
-
ते म्हणाले “सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षानेही राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांमुळे गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे.”
-
“लहान मुलं शाळेत जाताना आई-वडिलांना आम्ही मोबाइल वापरत नाही, असं दाखवतात. परंतु, घरातून बाहेर पडताच त्यांच्या फोनवर इन्स्टाग्राम सुरू होतं”, असं म्हणत त्यांनी लहान मुलांवर सोशल मीडियामुळे होणाऱ्या परिणामांकडेही लक्ष वेधून घेतलं.
-
“सोशल मीडियामुळे अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यांच्याबाबतेतील कायद्यांवरही विचार व्हायला पाहिजे”, असंही ते म्हणाले.
-
सायबर गुन्हेगारीचा मुद्दा मांडताना अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याबरोबर घडलेल्या घटनेचीही आठवण करून दिली.
-
ते म्हणाले, “जेष्ठ नागरिक, लहान मुले यांसह राज्यातील पोलीसही याचा शिकार होताना दिसत आहेत”.
-
“बीडमधील पोलीस अधिकक्षाचा फोटो आपल्या फेसबुकवर टाकून एका अज्ञात व्यक्तीकडून लोकांना मेसेज पाठवून पैशाची मागणी केली जात होती”.
-
पोलीस अधिक्षकच जर सायबर गुन्ह्याचे शिकार होऊ लागले. तर राज्यातील इतर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा विचार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
-
अजित पवारांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या सायबर गुन्ह्याशी संबंधित घटनेचीही आठवण करून दिली.
-
“एवढंच काय, मागे एकदा पुण्यात असताना माझ्याबरोबरही हा प्रकार घडला आहे. माझा फोन माझ्याकडे असताना एका अज्ञात व्यक्तीने माझ्या फोन नंबरवरून एका बिल्डरला कॉल करून २५ लाख खंडणीची मागणी केली होती”.
-
“बिल्डर माझ्या ओळखीचा असल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मी ताबडतोब पोलीसांना याची माहिती दिली. तपासानंतर दोन मुले यामागे असल्याचं समजलं”, असं ते म्हणाले.
-
राज्यातील वाढते गुन्हे पाहता या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना सायबर सेलमध्ये भरती करून घेण्याची गरज असल्याचंही अजित पवार म्हणाले.
-
(सर्व फोटो : File फोटो )
Photos : “ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांमुळे…”; अजित पवारांनी विधानसभेत सांगितला स्वत:बाबत घडलेला ‘तो’ प्रसंग
अजित पवारांनी सभागृहातील भाषणात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सायबर गुन्हेगारीचा मुद्दा मांडताना त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेचीही आठवण करून दिली.
Web Title: Maharashtra monsoon assembly session opposition ncp leader ajit pawar speech on cyber crime and social media photos kak