Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ganeshotsav 2022 ncp rohit pawar participated in ganesh visarjan miravnuk pune photos viral on social media kak

Photos : ढोलवादन, लाठी-काठीचा खेळ ते बाप्पाच्या रथाचं सारथ्य…गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांची चर्चा

Ganpati Visarjan 2022 : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी अनेक राजकीय नेतेही गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले.

Updated: September 10, 2022 10:36 IST
Follow Us
  • rohit pawar ganpati visarjan mirvnuk 2022 pune photos
    1/21

    राज्यातील गणपती विसर्जन मिरवणुका या कायमच चर्चेत असतात. यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला.

  • 2/21

    वाजत-गाजत बाप्पाला निरोप देताना भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

  • 3/21

    निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी अनेक राजकीय नेतेही गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले.

  • 4/21

    परंतु या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधून घेतलं.

  • 5/21

    रोहित पवार पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले.

  • 6/21

    गणरायाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक ही पुण्याची परंपरा आहे.

  • 7/21

    रोहित पवारांनी यात सहभागी होत मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांचा आनंद द्विगुणित केला.

  • 8/21

    पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते सहभागी झालेले दिसले.

  • 9/21

    यावेळी तरुणांकडून मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

  • 10/21

    रोहित पवारांनी या पथकाबरोबर लाठी-काठी फिरवत मर्दानी खेळ खेळत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले.

  • 11/21

    लाठी-काठीचे खेळ खेळताना रोहित पवार.

  • 12/21

    गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांनी बाप्पासाठी ढोलवादनही केले.

  • 13/21

    पुण्यातील मानाच्या तिसरा गुरुजी तालिम गणपती मंडळासमोर ढोल पथकाबरेबर त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.

  • 14/21

    ढोलवादन करताना रोहित पवार.

  • 15/21

    विर्सजन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका बाप्पाच्या रथाचं सारथ्य करतानादेखील रोहित पवार दिसले.

  • 16/21

    एवढंच काय रोहित पवारांनी कार्यकर्त्यांसह उसाचा रस आणि कचोरी खाण्याचा आनंद लुटला.

  • 17/21

    कचोरीचा आस्वाद घेताना रोहित पवार.

  • 18/21

    गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार गुलालाने पूर्णत: माखून गेले होते.

  • 19/21

    पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.

  • 20/21

    (सर्व फोटो : रोहित पवार/ इन्स्टाग्राम)

  • 21/21

    (हेही पाहा : ‘बाप्पा चालले गावाला…’, गुलालाची उधळण अन् ढोल-ताशाचा गजर, मोरयाच्या जयघोषात लालबागनगरी दुमदुमली)

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025राष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPरोहित पवारRohit Pawar

Web Title: Ganeshotsav 2022 ncp rohit pawar participated in ganesh visarjan miravnuk pune photos viral on social media kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.