• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra deputy cm devendra fadnavis talks about state politics says even today i can call can talk with uddhav thackeray refers raj thackeray sharad pawar scsg

“मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी…”; राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीसांचं विधान, शरद पवारांचाही केला उल्लेख

देवेंद्र फडणवीस यांना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी दोन प्रमुख नेत्यांची नावं घेतली.

Updated: September 15, 2022 21:02 IST
Follow Us
  • maharashtra deputy cm devendra fadnavis talks about State Politcs says even today i can call can talk with Uddhav Thackeray reffers Raj Thackeray Sharad Pawar
    1/27

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

  • 2/27

    असं असलं तरी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरण समोर येण्याच्या दोन दिवस आधीच फडणवीस यांनी आजही आपण उद्धव ठाकरेंना फोन करु शकतो असं विधान केलं होतं.

  • 3/27

    राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सध्या ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

  • 4/27

    विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी हे विधान केलेलं.

  • 5/27

    फडणवीस यांनी सीएनएन न्यूज १८ च्या टाऊन हॉल या विशेष कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रश्नावर बोलताना हे वक्तव्य केलं.

  • 6/27

    “बीएमसीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही शिंदे गटासोबत लढणार आणि नेतृत्व करणार असं म्हणालात. राज ठाकरेंसोबतही तुमच्या चर्चा होत राहतात असं मी ऐकलं,” असं म्हणत पत्रकार आनंद नरसिम्हन यांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला.

  • 7/27

    यावर उत्तर देताना फडणवीस यांनी थेट, “हो आमची मैत्री आहे आम्ही चर्चा करतो,” असं सांगितलं.

  • 8/27

    त्यानंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण हे दक्षिणेतील राजकारणापेक्षा वेगळं असल्याचं सांगितलं.

  • 9/27

    “महाराष्ट्रातील राजकारण हे दक्षिणेतील राज्यांच्या राजकरणापेक्षा वेगळं आहे,” असं सांगतानाच फडणवीस यांनी हा वेळेपणा काय आहे याबद्दलही भाष्य केलं.

  • 10/27

    “इथल्या (महाराष्ट्रातल्या) राजकारणामध्ये आम्ही एकमेकांचे शत्रू नाही राजकीय विरोधक आहोत,” असं फडणवीस राज यांच्यासंदर्भातील प्रश्नावर म्हणाले.

  • 11/27

    याचाच दाखला देताना पुढे फडणवीस यांनी, “मी आजही फोन उचलून थेट उद्धव ठाकरेंशी बोलू शकतो,” असं विधान केलं.

  • 12/27

    त्यावर मुलाखतकाराने, “करु शकता फोन?” असा प्रश्न आश्चर्याने फडणवीस यांना विचारला.

  • 13/27

    फडणवीस यांनी अगदी आत्मविश्वासाने, “हो हो नक्कीच करु शकतो,” असं सांगितलं.

  • 14/27

    “म्हणजे ते कनेक्शन अजून कट झालेले नाही?” असा प्रश्न फडणवीस यांच्या उद्धव ठाकरेंना मी आजही फोन करु शकतो या विधानावर पत्रकाराने विचारला.

  • त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख केला.
  • 15/27

    “हे पाहा राजकीय नाही तर इतर एखाद्या गोष्टीवर चर्चा करेन त्यांच्यासोबत (उद्धव ठाकरेंसोबत). शरद पवारांसोबत माझ्या चर्चा होतात,” असं फडणवीस म्हणाले.

  • 16/27

    “मी आजही त्यांच्यासोबत फोन करुन चर्चा करु शकतो,” असा उल्लेख पुन्हा एकदा फडणवीस यांनी उद्धव यांच्यासंदर्भात बोलताना केला.

  • 17/27

    “राज ठाकरेही एक नेते आहेत. आमचे मित्र आहेत,” असं फडणवीस पुन्हा राज यांच्यासंदर्भातील प्रश्नाकडे वळताना म्हणाले.

  • 18/27

    “त्यांच्याशी (राज ठाकरेंशी) बोलण्यात काही अडचण आहे असं वाटत नाही,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

  • 19/27

    “मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला फार छान पत्रं लिहिलं होतं,” असंही फडणवीस म्हणाले.

  • 20/27

    तसेच त्या पत्राची आठवण काढताना फडणवीस यांनी, “फार सुंदर शब्द वापरले होते त्यांनी,” असंही सांगितलं.

  • 21/27

    “मी विचार केलेला की त्या पत्राला उत्तर देईन. मात्र मला एवढे चांगले शब्दच सापडले नाहीत,” असं फडणवीस यांनी म्हटलं.

  • 22/27

    “मग मी जाहीर केलं की त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानेन. म्हणून मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले,” असं फडणवीस म्हणाले.

  • 23/27

    “लोकशाहीमध्ये ज्या प्रकारचा संवाद हवा असतो तसा यामध्ये आहे,” असं फडणवीस यांनी राज यांच्या घरी दिलेल्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल म्हटलं.

  • 24/27

    “त्यामुळे या साऱ्या संवादाला राजकीय दृष्टीकोनातून पाहण्याची गरज नाही,” असंही फडणवीस म्हणाले.

  • 25/27

    “भाजपा आणि शिंदेंच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना एकत्र आहे, असंही फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

  • 26/27

    “आम्ही एकत्र लढणार आहोत हे नक्की आहे,” असं ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात म्हणाले.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisशरद पवारSharad Pawar

Web Title: Maharashtra deputy cm devendra fadnavis talks about state politics says even today i can call can talk with uddhav thackeray refers raj thackeray sharad pawar scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.