• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. political reaction from eknath shinde to kishori pednekar on milind narvekar pbs

Photos : नार्वेकरांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या जोरदार चर्चा, एकनाथ शिंदेंपासून किशोरी पेडणेकरांपर्यंत कोण काय म्हणालं?

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

October 2, 2022 03:12 IST
Follow Us
  • शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
    1/10

    शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

  • 2/10

    यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या.

  • 3/10

    “गुलाबराव पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

  • 4/10

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. मात्र, त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.

  • 5/10

    मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वारंवार विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं म्हटलं. एक दिवस तरी राजकीय विषय सोडा, असंही ते मिश्कीलपणे प्रसारमाध्यमांना म्हणाले.

  • 6/10

    किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नाही.”

  • 7/10

    “आम्हाला आजही खात्री आहे की, मिलिंद नार्वेकर असं काही करणार नाहीत. तशी नक्कीच शक्यता नाही,” असंही किशोरी पेडणेकरांनी नमूद केलं.

  • 8/10

    चंद्रकांत खैर म्हणाले, “मिलिंद नार्वेकर कधीही जाणार नाही. ते उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचे जवळचे आहेत. मातोश्रीची माहिती काढण्यासाठी ते नार्वेकरांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते जाणार नाही.”

  • 9/10

    शिंदे गटातील नेते दीपक केसरकरांनीही चम्पासिंग थापा शिंदे गटात येऊ शकतात, तर मिलिंद नार्वेकर का येऊ शकत नाही, असं म्हटलं.

  • 10/10

    या सर्व घडामोडी सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर कुठे आहेत असा प्रश्न विचारला जातोय. अशातच मिलिंद नार्वेकरांनी एक ट्वीट करत म्हटलं, “मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.”

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Sena

Web Title: Political reaction from eknath shinde to kishori pednekar on milind narvekar pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.