Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ex cm uddhav thackeray full speech after ec frozen shivsena name bow and arrow symbol scsg

“मलाच CM व्हायचं आहे इथंपर्यंत…”, “आता अती होतंय…”, “तेव्हाही त्रास झालाच पण…”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

“माझा आत्मविश्वास आहे. तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत. तुम्ही डगमगायचे नाही,” असंही ते म्हणाले.

Updated: October 10, 2022 20:47 IST
Follow Us
  • Ex CM Uddhav Thackeray Full Speech After EC Frozen Shivsena Name Bow And Arrow Symbol
    1/18

    केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविण्याच्या निर्णय घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी ‘फेसबुक’द्वारे जनतेशी संवाद साधला.

  • 2/18

    यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका करतानाच आपली यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली तीन पर्यायी नावं आणि तीन पर्यायी निवडणूक चिन्हं यासंदर्भातही उद्धव यांनी भाष्य केलं.

  • 3/18

    उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मात्र उद्धव ठाकरे आपल्या या फेसबुक लाइव्ह दरम्यान नेमकं काय म्हणाले? वाचा त्यांचं संपूर्ण भाषण जसच्या तसं…

  • 4/18

    आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही कुटुंबीयच आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधतोय. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला.

  • 5/18

    सगळं देऊनही गद्दार गेले. आता जरा अति होऊ लागलं आहे. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथंपर्यंत ठीक होतं आता शिवसेनाप्रमुख व्हायला चालले. सगळ्यांना धन्यवाद दसरा मेळाव्यात विघ्न आणले. पण आपला दसरा मेळावा झालाच.

  • 6/18

    दोन मेळावे झाले असं म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते त्यांना धन्यवाद. तुम्ही आलात ते का? कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात.

  • 7/18

    १९ जून १९६६ तो काळ आजही आठवतो. घरी मराठी माणसांची वर्दळ. मार्मिकमध्ये तेव्हा वाचा आणि थंड बसा हे सदर होतं तेव्हा. आजोबांनी बाळासाहेबांना विचारले संघटना काढायचे ठरवले का? आजोबांनी नाव दिले ‘शिवसेना’.

  • 8/18

    पुढे हा ५६ वर्षांचा इतिहास आपल्या समोर. एक दिवस एक तगडा माणूस उभा ते दत्ताजी साळवी काही नसतांना लोक जुळत गेली. काहीच नव्हतं केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी माझा सिंहाचा खारीचा वाटा उचलणार म्हणून लोक जुळली.

  • 9/18

    वसंतराव मराठे ठाण्यात निवडून आले, अनेक जण अनेकांची नावे. त्यातून शिवसेनेचा विजयरथ पुढे निघाला. पहिल्यांदा ४२ नगरसेवक.

  • 10/18

    त्यांचा उद्देश त्यांना तरी समजला? यांचा उपयोग संपला की यांना फेकून देतील.

  • 11/18

    मला खात्री आहे सगळेच काही स्वार्थी नाहीत हे दसरा मेळाव्यात सिध्द झालं. शिवसैनिकांना दमदाट्या इंदिरा गांधीनी जे केले नाही ते तुम्ही केलं आहे. ही बाळासाहेबांची आठवण आहे.

  • 12/18

    तेव्हाही त्रास झालाच पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. आज भाजपाचे मग जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करता. शिवसैनिकांना ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना छळत आहात. मी डगमगलेलो नाही.

  • 13/18

    माझा आत्मविश्वास आहे. तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत. तुम्ही डगमगायचे नाही. अनेकांना फोन येतात. माझं आजही आव्हान आहे समोर या निवडणुकांना सामोरे जा. तुम्हाला सगळं हवं आहे पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय.

  • 14/18

    काही काळासाठी चिन्ह गोठवलं आहे. मला हा निकाल अनपेक्षित होता.

  • 15/18

    १६ आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. माझ्या कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल अशी खात्री.

  • 16/18

    आपण तीन चिन्हं दिली आहेत. त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल. तीन नावे दिली आहेत, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’, ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’.

  • आयोगाने आपण दिलेले पर्याय जाहीर केले पण गद्दारांनी काय दिलं आहे ते अद्याप सांगितलेले नाही. जनता सर्वोच्च आहे.
  • 17/18

    आम्हाला त्यांच्या दरबारात जायचे आहे म्हणून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath Shindeनिवडणूक आयोगElection CommissionशिवसेनाShiv Sena

Web Title: Ex cm uddhav thackeray full speech after ec frozen shivsena name bow and arrow symbol scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.