• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut open letter to mother eknath shinde uddhav thackeray prd

गद्दार, बंडखोरी, तुरुंगवास ते वीर सावरकर आणि टिळक; संजय राऊतांनी आईला लिहिलेल्या पत्राची चर्चा

सध्या तुरुंगात असलेले उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक खुले पत्र लिहिले आहे.

October 12, 2022 20:23 IST
Follow Us
  • sanjay raut and uddhav thackeray
    1/15

    शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांना दोन वेगवेगळी नावे तसेच दोन वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. या पक्षफुटीनंतर आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे.

  • 2/15

    या सर्व पार्श्वभूमीवर सध्या तुरुंगात असलेले उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेनेतील बंडखोरी, एकनिष्ठता, त्यांच्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई या सर्वावर भाष्य केले आहे.

  • 3/15

    आपल्या पत्रात संजय राऊत आपल्या आईला उद्देशू मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागते. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडून घेतला नाही का? असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

  • 4/15

    आपल्या पत्रात त्यांनी शिंदे गटालाही लक्ष्य केले आहे. “भुजबळ राणे, शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करु लागला तेव्हा ‘काहीतरी करा, शिवसेना वाचवा!’ असे सांगणारी तूच होतीस.

  • 5/15

    ‘हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?’ असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवावायची. टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच,” असे संजय राऊत आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

  • 6/15

    खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज ‘सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो.दौऱ्यावर असताना सकाळ-संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली, असेही राऊत म्हणाले.

  • 7/15

    शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. मऱ्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस!

  • 8/15

    मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात ‘संजय’ कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते.

  • 9/15

    ‘ईडी’,’इन्कम टॅक्स’ वैगेरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे.

  • 10/15

    माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटो आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी ‘गन पॉइंट’वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत.

  • 11/15

    अप्रत्यक्षपणे ठाकऱ्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा?

  • 12/15

    उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

  • 13/15

    आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदी तुडवायचा आहे.

  • 14/15

    पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल?

  • 15/15

    मी आताच ऐकले, ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी सोनिया व राहुल गांधीचाही छळ सुरु आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उढतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut open letter to mother eknath shinde uddhav thackeray prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.