• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress president election mp shashi tharoor visited sabarmati ashram in ahmedabad gujrat rvs

PHOTOS: काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शशी थरुर मोदींच्या बालेकिल्ल्यात, साबरमती आश्रमाला दिली भेट

October 13, 2022 15:18 IST
Follow Us
  • काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रचारादरम्यान काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी कार्यकर्त्यांसह गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. (फोटो सौजन्य-निर्मल हरिंद्रन, एक्स्प्रेस)
    1/12

    काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रचारादरम्यान काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी कार्यकर्त्यांसह गुजरातमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. (फोटो सौजन्य-निर्मल हरिंद्रन, एक्स्प्रेस)

  • 2/12

    साबरमती आश्रमात शशी थरुर यांचे स्वागत करण्यात आले.(फोटो सौजन्य-निर्मल हरिंद्रन, एक्स्प्रेस)

  • 3/12

    शशी थरुर यांनी साबरमती आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केले.(फोटो सौजन्य-निर्मल हरिंद्रन, एक्स्प्रेस)

  • 4/12

    साबरमती आश्रमात शशी थरुर यांनी चरखा चालवला.(फोटो सौजन्य-निर्मल हरिंद्रन, एक्स्प्रेस)

  • 5/12

    महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर शशी थरुर यांनी गुजरात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (फोटो सौजन्य- शशी थरुर ट्विटर)

  • 6/12

    काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात थेट लढत होत आहे.

  • 7/12

    या निवडणुकीसाठी येत्या १७ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल १९ ऑक्टोबरला घोषित करण्यात येणार आहे.

  • 8/12

    काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार शशी थरुर जोरदार प्रचार करत आहेत. देशातील विविध राज्यांमधील कार्यकर्त्यांचे समर्थन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. (फोटो सौजन्य- शशी थरुर ट्विटर)

  • 9/12

    शशी थरुर यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अनेक बदल करण्याचं आश्वासन दिलं आहे.(फोटो सौजन्य- शशी थरुर ट्विटर)

  • 10/12

    लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पक्षाला मजबूत करावे लागेल. त्याकरिता दिल्ली केंद्रित अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरुर यांनी मांडली आहे.(फोटो सौजन्य-निर्मल हरिंद्रन, एक्स्प्रेस)

  • 11/12

    काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राज्यातील ८०० प्रतिनिधी मतदान करतील. त्यात प्रदेश काँग्रेसच्या ५६५ प्रतिनिधींचा समावेश आहे.(फोटो सौजन्य-निर्मल हरिंद्रन, एक्स्प्रेस)

  • 12/12

    अध्यक्षपदाचे प्रतिस्पर्धी मल्लिकार्जुन खरगे हे माझे सहकारी आणि मित्र आहेत. आम्हा दोघांनाही गांधी परिवाराचा आशीर्वाद आहे. दोघांपैकी कुणीही एकजण निवडून आला तरी तो पक्षाचा विजय असेल, असे थरुर यांनी म्हटले आहे.

TOPICS
काँग्रेसCongressमल्लिकार्जुन खरगेMallikarjun Khargeमहात्मा गांधीMahatma Gandhiशशी थरूरShashi Tharoor

Web Title: Congress president election mp shashi tharoor visited sabarmati ashram in ahmedabad gujrat rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.