-
शिवसेनेते बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत पहिल्यांदा बंड करणाऱ्या छगन भुजबळ यांच्याही बंडाची जोरदार चर्चा झाली.
-
मात्र, भुजबळांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाही बंड कसा केला आणि त्यावेळी काय झालं होतं? याविषयी अनेकांना उत्सुकता असते.
-
आता याबाबतचा प्रसंग स्वतः छगन भुजबळांनीच सांगितला आहे. ते रविवारी (१५ ऑक्टोबर) एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या मुलाखत कार्यक्रमात बोलत होते.
-
मी बंड केल्यानंतर पोलीस आयुक्त माझ्यासह त्या १२ बंडखोर आमदारांना दररोज वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे – छगन भुजबळ
-
त्यावेळी पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते. त्यांच्या मागच्या रुममध्येही आम्हाला लपवून ठेवण्यात आलं. कारण आम्हाला पूर्ण तयारीनिशी शोधलं जात होतं – छगन भुजबळ
-
त्यावेळी नुकतेच ठाण्याच्या खोपकरांना शिवसेनेच्या विरोधात मतदान केल्याच्या संशयातून भयानकपणे ठार करण्यात आलं होतं – छगन भुजबळ
-
ती भीती प्रत्येकाच्या मनात होती. मलाही त्या प्रसंगाने भीती वाटत होती – छगन भुजबळ
-
माझ्याही बाबतीत तसं झालं असतं. मी त्यांना सापडलो असतो तर त्यांनी मला सोडलं नसतं – छगन भुजबळ
-
नंतरच्या काळातही त्यांनी मला सोडलं नाही. त्यामुळे माझा नागपूरलाच महसूलमंत्री म्हणून शपथविधी करून घेतला. मी जेव्हा विमानतळावर उतरलो तेव्हा विमानतळापासून माझ्या माझगावच्या घरापर्यंत काचांचा सडा पडला होता – छगन भुजबळ
-
मी घाटकोपर आणि इतर ठिकाणी काँग्रेसची बैठक घ्यायला गेलो. बैठकीच्या ठिकाणी फटाफट दगड यायचे आणि लोकांची डोकं फुटायची – छगन भुजबळ
-
मी कुठेही चाललो तर कुठेही आडवे यायचे आणि दगडफेक करायचे – छगन भुजबळ
-
त्यावेळी काँग्रेसवाले फार वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही. ते आपले ‘तू आला तू आपलं बघ’ म्हणत गंमत बघत बसायचे – छगन भुजबळ
-
अशा स्थितीत आम्हीच आमची जी तयारी होती त्यानुसार मार्ग काढत हळूहळू पुढे गेलो – छगन भुजबळ
-
शिवसेनेतून बाहेर माणूस जाऊ शकतो, बाहेर यायला रस्ता नाही अशी त्यावेळची खरी परिस्थिती होती – छगन भुजबळ
-
आता शिवसेनेत तशी परिस्थिती नाही. आता शिवसेनेचे दरवाजे सताड उघडे आहेत – छगन भुजबळ
Photos : “…म्हणून ठाण्याच्या खोपकरांची निर्घृण हत्या झाली होती”, भुजबळांनी सांगितला प्रत्येकाच्या मनात भीती तयार करणारा ‘तो’ प्रसंग
भुजबळांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाही बंड कसा केला आणि त्यावेळी काय झालं होतं? याविषयी अनेकांना उत्सुकता असते. आता याबाबतचा प्रसंग स्वतः छगन भुजबळांनीच सांगितला आहे.
Web Title: Chhagan bhujbal tell about his experience after rebel in shivsena and murder of shridhar khopkar from thane pbs