• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. heavy rain in pune city water in city streets and urban areas msr

PHOTOS : आभाळ फाटलं!, पुणेकरांनी अनुभवला उरात धडकी भरवणारा पाऊस

अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी, झाडे पडली आणि शहरातील जवळपास सर्वच रस्ते झाले जलमय

Updated: October 18, 2022 13:24 IST
Follow Us
  • पुणे शहर आणि परिसरात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस मध्यरात्री पर्यंत सुरू होता.(फोटो सौजन्य -सागर कासार, अरुल होरायझन)
    1/32

    पुणे शहर आणि परिसरात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस मध्यरात्री पर्यंत सुरू होता.(फोटो सौजन्य -सागर कासार, अरुल होरायझन)

  • 2/32

    सर्व रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले.

  • 3/32

    झाडे, फांद्या आणि भिंती कोसळण्याच्या घटनाही घडल्या.

  • 4/32

    रात्री घराबाहेर असलेले अनेक नागरिक ठिकठिकाणी अडकून पडले.

  • 5/32

    विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या धुवाधार पावसाने पुणेकरांमध्ये अक्षरश: धडकी भरवली.

  • 6/32

    रात्री साडेनऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रात्री बारापर्यंत कायम होता.

  • 7/32

    शहरासह जिल्ह्यातही बहुतांश भागांत मुसळधार पाऊस झाला.

  • 8/32

    या मुसळधार पावसामुळे पर्वती येथील रमणा गणपतीजवळ भिंतीचा काही भाग कोसळला.

  • 9/32

    तर शहरातील अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनांमुळे वाहनांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

  • 10/32

    शिवाजीनगर केंद्रावर रात्री अकरापर्यंत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

  • 11/32

    १२ नागरिक पावसात अडकून पडले होते

  • 12/32

    त्या सर्वांची सुटका अग्निशामक विभागाच्या अधिकारी,कर्मचार्‍यांनी केली.

  • 13/32

    अनेक सोसायटी, बैठी घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.

  • 14/32

    दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.

  • 15/32

    पाऊस सुरू झाल्यानंतर काही वेळांतच रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. तासाभरात शहरातील जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली गेले.

  • 16/32

    त्यामुळे दुचाकीच नव्हे, तर चारचाकी वाहनेही रस्त्याने चालविणे कठीण झाल्याने संपूर्ण शहरच ठप्प झाले. पाऊस सुरू होताना घराबाहेर असलेले नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले.

  • 17/32

    शहराच्या विविध भागांतून अग्निशमन केंद्रांत दूरध्वनी येत होते. रात्री बारानंतरही पाऊस कायम होता.

  • 18/32

    पाण्यात अडकलेल्या वाहनांना काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली.

  • 19/32

    संपूर्ण रस्ता जलमय झाला असल्याने एक मोटार पाण्यातच अडकून होती.

  • 20/32

    ती वाहून जाऊन तिचे नुकसान होऊ नये म्हणून नागरिकांनी तिला दोरी बांधली होती

  • 21/32

    रस्त्यावर एवढे पाणी होते की ती मोटार अर्धी पाण्यात बुडालेली होती.

  • 22/32

    मोटीरीत पाणी शिरल्याने तिचे बरेच नुकसान झाले.

  • 23/32

    पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड परिसरातही दमदार पाऊस झाला.

  • 24/32

    कमी वेळेत अधिक तीव्रता आणि मोठ्या कालावधीतील हा शहरातील या हंगामातील पहिला पाऊस ठरला. शहर आणि परिसरात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

  • 25/32

    अरबी समुद्रातून येणारे मोठ्या प्रमाणावरील बाष्प आणि स्थानिक स्थितीमुळे शहरात पावसाचा जोर वाढला.

  • 26/32

    कमी वेळेत अधिक तीव्रता आणि मोठ्या कालावधीतील हा शहरातील या हंगामातील पहिला पाऊस ठरला. शहर आणि परिसरात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

  • 27/32

    मुसळधार पाऊस आणि जलमय रस्त्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले होते.

  • 28/32

    या पावसामुळे अनेक फेरीवाल्यांचेही नुकसान झाले.

  • 29/32

    पावसामुळे रस्त्यावर राडारोडा पसरला.

  • 30/32

    या मुसळधार पावसाचा अनेकांना फटका बसला.

  • 31/32

    रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. 

  • 32/32

    पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार शहरावर सुमारे ७ ते ११ किलोमीटर उंचीचे ढग तयार झाले. त्यामुळे साडेनऊनंतर मात्र पावसाने जोर धरला.

TOPICS
पर्जन्यवृष्टीRainfallपुणेPuneपुणे न्यूजPune Newsहेवी रेन अलर्टHeavy Rain

Web Title: Heavy rain in pune city water in city streets and urban areas msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.