-
राज्यातील प्रकल्प गुजरात जात असल्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले.(सर्व फोटो – संग्रहित)
-
“ प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला, गुजरातमध्ये गेला. माझी मागची सर्व भाषणे तुम्ही जर काढून बघितली तर पहिल्यापासून माझं मत हे असंच होतं की, पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान असलं पाहिजे.”
-
“उद्या जर महराष्ट्रातील हा प्रकल्प बाहेर गेला असता असं समजा की आसामला गेला असता, तर मला वाईट नसतं वाटलं. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतंय की जो प्रकल्प येतोय आणि बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय.”
-
“मला असं वाटतं पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजंच आहे.”
-
“प्रत्येक गोष्ट ही जर गुजरातला जात असेल तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो त्यावेळी त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?”
-
“मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे आणि तो सगळ्या देशाचा असला पाहिजे.”
-
“प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत.”
-
“तिकडच्या लोकांना तिथून आपलं घर सोडून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यावर ओझं बनण्याची आवश्यकता नाही.”
-
“असे प्रकल्प जर समजा प्रत्येक राज्यांमध्ये गेले तर देशाचाच विकास होईल.”
-
“आजही महाराष्ट्र राज्य उद्योग-धंद्यांच्याबाबतीत हे इतर कोणत्याही राज्यापेक्षा पुढे आहे.”
-
“उद्योग-धंद्यांच्याबाबतीत महाराष्ट्र नेहमीच प्रगतीपथावर राहिलेला आहे. उद्योगपतींनाही महाराष्ट्र हेच राज्य त्यांचं प्रथम क्रमांकाचं वाटत आलेलं आहे.”
-
“त्यामुळे असं नाही की गुजरातमध्ये फार चांगल्या सुविधा आहेत आणि महाराष्ट्रात कमी सुविधा आहेत.”
-
“मला असं वाटतं की या गोष्टीकडे राजकीय न पाहता, देशाचा विकास म्हणून प्रत्येक राज्य मोठं करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे.” असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
-
“सध्याचं जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत खालच्या पातळीवरचं आहे.”
-
“असं राजकारण मी या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं. दु“जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, जी भाषा वापरली जात आहे तीही इतक्या खालच्या स्तराची भाषा आहे.”र्दैवं दुसरं काय बोलणार.” असे म्हटले.
-
“असं राजकारण मी या अगोदर कधी पाहिलेलं नव्हतं. दुर्दैवं दुसरं काय बोलणार.” असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केलं लक्ष्य, म्हणाले “वाईट याचंच वाटतं की…”
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत; “ सध्याचं जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत खालच्या पातळीवरचं आहे”, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
Web Title: Raj thackeray targets prime minister modi over projects in maharashtra going to gujarat msr