Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. gujarat assembly election 2022 gujarat bjp releases song and slogan for election campaign rvs

Photos: गुजरात निवडणुकीसाठी भाजपाकडून गाणं लॉन्च, प्रचार मोहिमेसाठी दिला ‘हा’ नारा

गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला मतदार आपला हक्क बजावणार आहेत

November 7, 2022 17:38 IST
Follow Us
  • गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये रविवारपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)
    1/12

    गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये रविवारपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)

  • 2/12

    भाजपा प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह गृहमंत्री हर्ष संघवी, भाजपाचे महासचिव प्रदीपसिंह वाघेला यावेळी उपस्थित होते.(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)

  • 3/12

    ‘आम्ही हा गुजरात बनवला आहे’ असा या निवडणूक प्रचाराचा नारा आहे. भाजपा महासचिव प्रदीपसिंह वाघेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकासोबत पोझ देताना…(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)

  • 4/12

    गांधीनगरच्या ‘कमलम’ या भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधानांच्या फलकासोबत फोटो काढताना भाजपाच्या महिला कार्यकर्त्या…(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)

  • 5/12

    पक्षाच्या गाण्यावर भाजपा कार्यकर्त्यांनी ठेका धरला…(फोटो सौजन्य- निर्मल हरिंद्रन)

  • 6/12

    गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी लढत होताना दिसत आहे. भाजपाला सत्तेतून खेचण्यासाठी काँग्रेस आणि आपकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे.

  • 7/12

    गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात एक डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात पाच डिसेंबरला मतदार आपला हक्क बजावतील.

  • 8/12

    गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आठ डिसेंबरला होणार आहे. १९९५ पासून सलग पाच वेळा भाजपाने ही निवडणूक जिंकली आहे.

  • 9/12

    गुजरात निवडणुकीत भाजपाला आम आदमी पक्षाचं कडवं आव्हान असणार आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राज्यात झंझावाती प्रचार केला आहे. आपने उमेवारांच्या ११ याद्या आत्तापर्यंत जारी केल्या आहेत.

  • 10/12

    गुजरात भाजपाकडून अद्याप उमेवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे.

  • 11/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘पापा नी परी’ या भावनगरमधील सामूहिक विवाह सोहळ्यात हजेरी लावली होती. भावी आयुष्यासाठी नवदाम्पत्यांना मोदींनी आशीर्वाद दिले. (फोटो सौजन्य-नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरुन)

  • 12/12

    यावेळी उपस्थितांमध्ये मोदींची झलक टिपण्यासाठी चढाओढ सुरू होती. (फोटो सौजन्य-नरेंद्र मोदी यांच्या ट्विटरवरुन)

TOPICS
गुजरात निवडणूकGujarat Electionनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJP

Web Title: Gujarat assembly election 2022 gujarat bjp releases song and slogan for election campaign rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.