• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. rahul gandhi participated in mashal morcha during bharat jodo yatra of congress in deglur nanded rvs

Photos: मशालींनी झळाळलं देगलूर, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचं शहरात जंगी स्वागत

“लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही देशभर चालत आहोत. मात्र, या समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत”, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे

Updated: November 8, 2022 15:28 IST
Follow Us
  • खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीतून सुरू झालेली 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेचं नांदेडच्या देगलूरमध्ये सोमवारी रात्री स्वागत करण्यात आलं.
    1/12

    खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीतून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेचं नांदेडच्या देगलूरमध्ये सोमवारी रात्री स्वागत करण्यात आलं.

  • 2/12

    राहुल गांधींनी छ्त्रपती शिवाजीमहाराजांना आदरांजली वाहिली. यावेळी सभेत गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’… ही घोषणा देऊन केली.

  • 3/12

    “देशात महागाई, बेरोजगारी वाढत आहे. छोटे आणि मध्यम उद्योग देशातील रोजगाराचा कणा आहेत. हा कणा नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीने आणि जीएसटी धोरणाने तोडला आहे”, असा हल्लाबोल यावेळी गांधी यांनी केला.

  • 4/12

    ‘भारत जोडो’ पदयात्रींनी देगलूरमध्ये मशाल मोर्चा काढला होता. राहुल गांधीदेखील हातात मशाल घेत या मोर्चात सहभागी झाले होते.

  • 5/12

    देगलूरमधील सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 6/12

    या यात्रेचे लक्ष्य भारताला एकजुट करण्याचे आहे, असे गांधी यावेळी म्हणाले. भारतामध्ये द्वेष, क्रोध आणि हिंसा पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  • 7/12

    लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही देशभर चालत आहोत. मात्र, या समस्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

  • 8/12

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसेवक ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना राहुल गांधी…

  • 9/12

    ‘भारत जोडो’ यात्रेसाठी बनवलेल्या चित्रफितीमध्ये ‘केजीएफ-२’ या चित्रपटातील संगीताचा वापर केल्यामुळे काँग्रेस आणि ‘भारत जोडो’ यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश बंगळुरू न्यायालयाने दिले आहेत.

  • 10/12

    “देशातील हिंसेविरोधात आवाज उठवण्यासाठी कन्याकुमारीतून निघालेली यात्रा श्रीनगरलाच थांबेल. ही यात्रा मध्ये कोणीही रोखू शकणार नाही”, असे गांधी यांनी म्हटले आहे.

  • 11/12

    काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासमवेत १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजीमंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो- राहुल गांधी यांच्या फेसबुकवरुन)

TOPICS
काँग्रेसCongressभारत जोडो यात्राBharat Jodo Yatraराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Rahul gandhi participated in mashal morcha during bharat jodo yatra of congress in deglur nanded rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.