• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut comment on alliance of shivsena uddhav thackeray vba prakash ambedkar sharad pawar pbs

Photos : प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत स्पष्टच म्हणाले, “स्वतः शरद पवार…”

November 11, 2022 19:45 IST
Follow Us
  • मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
    1/12

    मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

  • 2/12

    अशातच आता प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार आहेत.

  • 3/12

    याच पार्श्वभूमीवर आंबेडकर-ठाकरे युती होणार का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला.

  • 4/12

    त्यावर राऊतांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ते शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

  • 5/12

    संजय राऊत म्हणाले, “महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत हातात हात घालून काम करत होते.”

  • 6/12

    “महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रखर मतं आहेत. ती मतं इतिहासात नोंदली गेली आहेत,” असंही राऊतांनी नमूद केलं.

  • 7/12

    संजय राऊत पुढे म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यानंतर बाबासाहेब आले.”

  • 8/12

    “हे आजोबांचं नातं आहे आणि आता ते नातवांपर्यंत पोहचलं आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

  • 9/12

    “प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी माझ्या मनात सदैव आदर राहिला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

  • 10/12

    राऊत पुढे म्हणाले, “आंबेडकर ही एक ताकद आहे आणि ठाकरे ही एक ताकद आहे. ही ताकद जेव्हा एकत्र येईल तेव्हा महाराष्ट्राचंच नाही तर देशाच्या राजकारणाचं चित्र बदललेलं दिसेल.”

  • 11/12

    “प्रकाश आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व मला माहिती आहे. महाराष्ट्र त्यांच्यावरही तितकाच प्रेम करतो,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

  • 12/12

    “आम्ही एकत्र बसू. स्वतः शरद पवार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे, शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे पाईक आहेत,” असं म्हणत राऊतांनी आंबेडकर-पवार मतभेदांचा मुद्दा फेटाळला.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayप्रकाश आंबेडकरPrakash Ambedkarराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPवंचित बहुजन आघाडीVBAशरद पवारSharad PawarशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut comment on alliance of shivsena uddhav thackeray vba prakash ambedkar sharad pawar pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.