Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. political parties and election commission ready for gujarat assembly poll hd import spb

गाणे, बॅनर, रॅली आणि निदर्शने; विधानसभा निवडणुकीसाठी गुजरात सज्ज; पाहा Photos

.

Updated: November 17, 2022 19:07 IST
Follow Us
  • आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाची निवडणूक ही दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान पार पडेल. यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लागले आहेत. बऱ्यापैकी ऑटो रिक्षांवरती राजकीय पक्षाचे बॅनर दिसून येत आहे.
    1/9

    आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाची निवडणूक ही दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान पार पडेल. यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लागले आहेत. बऱ्यापैकी ऑटो रिक्षांवरती राजकीय पक्षाचे बॅनर दिसून येत आहे.

  • 2/9

    पहिल्या टप्प्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेली अर्ज भरण्याची प्रक्रिया १४ पर्यंत सुरू होती. उमेवारी अर्ज भरल्यानंतर भाजपा नेते हार्दिक पटेल यांनी विरंगम विधानसभा मतदारसंघातून रॅली काढली.

  • 3/9

    दरम्यान, पहिल्या टप्प्यासाठी होणाऱ्या ८९ जागांसाठी आतापर्यंत १३६२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ११ नोव्हेंबररोजी सुरतमध्ये मोक्षेश संघवी आणि महेंद्र नावडिया यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळी आप नेते गोपाल इटालीयाही उपस्थित होते.

  • 4/9

    सर्वच पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा करण्यात येत आहे. तसेच अनेक राजकीय पक्षांनी गाणेही तयार केले आहेत. काँग्रेसकडून या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  • 5/9

    भाजपानेही ५ नोव्हेंबर रोजी ‘अग्रेसर गुजरात’ ही ११ दिवसांची निवडणूक मोहीम सुरू केली होती. यावेळी जाहीरनाम्यासाठी लोकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. यावेळी भाजपाकडूनही प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आले होते. हे गीत प्रसिद्ध झाल्यानंतर महिल्या कार्यकर्त्यांनी पीएम मोदींच्या कटआउटसह फोटोही काढले.

  • 6/9

    भाजपने सोमवारी १२ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भूपेंद्र पटेल यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष केला. ते अहमदाबादमधील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  • 7/9

    या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी इशुदान गढवी यांना पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार म्हणून घोषित केले होते.

  • 8/9

    दरम्यान, सोमवारी काँग्रेसने जमालपूर-खाडिया आणि वाटवा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी काँग्रेस कारकर्त्यांकडून काँग्रेस पक्ष कार्यालयाची भींतही तोडण्यात आली. तसेच पक्षाच्या कार्यालयाबाहेर लावलेले पोस्टरही कार्यकर्त्यांनी काढले.

  • 9/9

    दरम्यान, राजकीय पक्षांबरोबरच निवडणूक आयोगाकडूनही निवडणुकीसाठी सज्ज आहे. ९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याकडून ईव्हीएम तपासणी करण्यात आली.

TOPICS
आम आदमी पार्टीAam Aadmi PartyगुजरातGujaratगुजरात निवडणूकGujarat Electionभारतीय जनता पार्टीBJPभारतीय राष्ट्रीय काँग्रेसIndian National Congress

Web Title: Political parties and election commission ready for gujarat assembly poll hd import spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.