-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून वारंवार होत आहे.
-
अशातच धक्का दिल्याची घटना घडल्यानंतर संबंधित पीडित महिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी बैठक झाल्याचाही आरोप होतोय.
-
याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
-
घटना घडल्यापासून गुन्हा दाखल होईपर्यंत मधल्या वेळेत काय घडलं याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अजित पवारांनी केली.
-
तसेच दोषी असेल तर अजित पवारावरही कारवाई करा, असंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी (१५ नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
जितेंद्र आव्हाडांना या प्रकरणात कोणी अडकवत आहे का? या प्रश्नावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
-
ती घटना घडल्यापासून त्या भगिणीने पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करेपर्यंत मधल्या काळात काय घडलं? त्यांनी कोणाशी चर्चा केली, काय चर्चा झाली याची पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे. त्यातून चित्र स्पष्ट होईल – अजित पवार
-
विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची भेट राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या घरी झाल्याच्या आरोपाबाबतही अजित पवारांना विचारणा करण्यात आली.
-
त्यावर ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हा दाखल करण्याबाबतची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी होवो किंवा अजित पवारच्या घरी होवो, दोषींवर कारवाई व्हावी.”
-
दोषी असेल तर अजित पवारवरही कारवाई करा – अजित पवार
-
पक्ष म्हणून बैठक घेणाऱ्या नगरसेवकावर काय कारवाई करणार? या प्रश्नावरही अजित पवारांनी उत्तर दिलं.
-
ते म्हणाले, “या प्रकरणात जो दोषी असेल तो समोर आला पाहिजे.”
-
माध्यमं सांगतात म्हणून मी ग्राह्य धरणार नाही. चौकशीत ते पुढे आलं पाहिजे. चौकशीत पारदर्शकपणे ते समोर येईल – अजित पवार
-
मी सत्तेत असतानाही माझ्या कार्यकर्त्यांना सांगत आलोय की, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर मी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही – अजित पवार
-
ही माझी नेहमीची मतं आहेत – अजित पवार
राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या घरी आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करणारी महिला आणि CM शिंदेंची भेट? अजित पवार म्हणाले…
धक्का दिल्याची घटना घडल्यानंतर संबंधित पीडित महिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी बैठक झाल्याचाही आरोप होतोय.
Web Title: Ajit pawar answer allegation of meeting of victim and cm eknath shinde at ncp worker home pbs