Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos warning to shinde group chief minister of maha vikas aghadi in 2024 and prayer to god know what sanjay raut said on his birthday msr

PHOTOS : शिंदे गटाला इशारा, २०२४ मध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ते वाढदिवशी देवाकडे केलेली प्रार्थना; जाणून घ्या संजय राऊत काय म्हणाले

“शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे.” असंही म्हणाले आहेत.

November 15, 2022 17:37 IST
Follow Us
  • शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. (फोटो -अमित चक्रवर्ती)
    1/15

    शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. (फोटो -अमित चक्रवर्ती)

  • 2/15

    याशिवाय भांडूर येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकजण त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासही येत आहेत.

  • 3/15

    पत्राचाळ प्रकरणी दसरा, दिवाळी तुरुंगात गेल्यानंतर संजय राऊत नुकतेच तुरुंगातून बाहेर आले आहेत.

  • 4/15

    यामुळे शिवसैनिकांमध्ये(ठाकरे गट) सध्या आनंदाचे वातावरण आहे.

  • 5/15

    दरम्यान आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ईश्वराकडे काय प्रार्थना केली, याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली आहे.(सर्व फोटो-संग्रहित)

  • 6/15

    प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “मी असेल, ठाण्यात जितेंद्र आव्हाडांचं एक खोटं प्रकरण सुरू आहे जोरात. हे सगळं केल्यामुळे कोणाला काय विकृत आनंद मिळतोय मला माहीत नाही.”

  • 7/15

    “पण हे सगळं थांबायल हवं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र त्याच निर्मळ, पारदर्शक पद्धतीने कामाला लागायला हवा.”

  • 8/15

    “आपल्या परंपरेला जपणारा महाराष्ट्र, अशी मी आजच्या दिवशी ईश्वराकडे प्रार्थना केली.”

  • 9/15

    तसेच ठाण्यातील राड्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, “शिवसैनिकांवर जर हल्ले करणार असाल, शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल तर शिवसैनिकांचं रक्त इतकं स्वस्त नाही, हे लक्षात घ्या.”

  • 10/15

    “शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे.”

  • 11/15

    “ज्यांनी शिवसैनिकाचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला, ते राजकारणातून, समाजकारणातून आणि जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले. त्यांचं भविष्यात फारकाही चांगलं झालं नाही.”

  • 12/15

    “लढाई संपलेली नाही, माझ्यासारख्या माणसाविरुद्ध सतत अशा खोट्या कारवाया होत राहणार हे मला माहीत आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत ही न संपणारी लढाई आहे . ”

  • 13/15

    “आम्हाला पूर्ण खात्री आहे की २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल.”

  • 14/15

    “हे मी आजच्या दिवशी सांगतो आहे आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे.”

  • 15/15

    “मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे.”

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Photos warning to shinde group chief minister of maha vikas aghadi in 2024 and prayer to god know what sanjay raut said on his birthday msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.