-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात सुरु आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या बुलढाण्यातील सभेला परवानगी देण्यावरून वाद सुरु आहे.
-
याबाबत पत्रकारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता, ‘यासाठीच आम्ही आणि काँग्रेस एकत्र आल्याचं सांगितलं.’ शीवतीर्थावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त सहकुटुंब त्यांनी आदरांजली अर्पण केली. त्यानंतर ते बोलत होते.
-
उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या सभेसाठी परवानगी लागते. त्यांचे लोक वाटेल ते करतात. देशाचं स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सध्या काँग्रेसच नव्हे कर देशातील विविध पक्ष प्रयत्नशील आहेत.
-
त्यामुळेच आम्ही काँग्रेसबरोबर एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
-
किमान समान कार्यक्रमावर मी गेली अडीच वर्षे सरकार चालवले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत आम्ही एकत्र होतो.
-
जे तोतया हिंदुत्ववाद्यांना बरेच काळ जमले नाही, ते नामंतरण (संभाजीनगर आणि धाराशिव) आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने करून दाखवलं याचा मला अभिमान आहे, असे रोखठोक उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले.
-
राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाशी मी सहमत नाही. मी आजही स्पष्टपणे सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल आदर, प्रेम, आपुलकी आमच्या मनात आहेच.
-
ती कधीच पुसली जाणार नाही. पण जे लोक स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते त्यांना स्वातंत्र्यावीरांबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही.
-
स्वातंत्र्यलढ्यात तुमचे किती कार्यकर्ते होते हे आधी पाहावं मग सावरकरांवर बोलावं, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली.
“देशातील स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसबरोबर”, उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं
“जे तोतया हिंदुत्ववाद्यांना बरेच काळ जमले नाही, ते…”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Web Title: Uddhav thackeray on why shivsena allience congress ssa