Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important 10 statement of shinde faction mla sanjay gaikwad about chhatrapati shivaji maharaj bjp governor bhagat singh koshyari pbs

“राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला” ते “शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं”, संजय गायकवाडांची १० महत्त्वाची विधानं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांनी केलेल्या १० मोठ्या वक्तव्यांचा आढावा.

Updated: November 21, 2022 20:41 IST
Follow Us
  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
    1/15

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

  • 2/15

    महाविकासआघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरलं आहे.

  • 3/15

    असं असतानाच आता शिंदे गटातील आमदारही या मुद्द्यावर आक्रमक झालेले बघायला मिळत आहे.

  • 4/15

    बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी (२१ नोव्हेंबर) बुलढाण्यात या प्रकरणावर मोठी विधानं केली.

  • 5/15

    त्यापैकी संजय गायकवाडांच्या १० महत्त्वाच्या वक्तव्यांचा आढावा.

  • 6/15

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन ते चारवेळा एकेरी उल्लेख केला – संजय गायकवाड

  • 7/15

    छत्रपतींना शिवाजी म्हणतात आणि शिवाजी जुने झाले असं राज्यपाल सांगतात. त्यांना कळालं पाहिजे की, शिवविचार कधी जुना होत नाही – संजय गायकवाड

  • 8/15

    छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही – संजय गायकवाड

  • 9/15

    माझी भाजपाच्या सर्व केंद्रीय नेत्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, राज्य काय आहे हे ज्याला कळत नाही, अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही – संजय गायकवाड

  • 10/15

    महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूसच ठेवावा – संजय गायकवाड

  • 11/15

    भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बालसंभाजीसह आग्र्याला औरंगजेबाच्या ज्या दरबारात कोणी मान वर करत नाही, त्या दरबारात ताठ मानेने खडेबोल औरंगजेबाला खडेबोल सुनावण्याचं धाडस दाखवलं – संजय गायकवाड

  • 12/15

    शिवाजी महाराज कधीही माफीनाम्याच्या मागे लागले नाही – संजय गायकवाड

  • 13/15

    शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. त्यांनी देशभरात स्वराज्य निर्माण केलं. भाजपाचे राज्यपाल किंवा त्रिवेदी या लोकांनी शिवाजी महाराजांविषयी विचार करून बोललं पाहिजे – संजय गायकवाड

  • 14/15

    यानंतर आम्ही असा अपमान सहन करणार नाही – संजय गायकवाड

  • 15/15

    भाजपाच्या लोकांकडून सारखासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं. त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील – संजय गायकवाड

TOPICS
छत्रपती शिवाजी महाराजChhatrapati Shivaji Maharajभगतसिंह कोश्यारीBhagatsingh Koshyariभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Important 10 statement of shinde faction mla sanjay gaikwad about chhatrapati shivaji maharaj bjp governor bhagat singh koshyari pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.