-
सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज शिवसेनेत ( ठाकरे गट ) प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.
-
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालया सुनावणी सुरु आहे. मला वाटत राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवले गेले. केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्तीला पदावर बसवता कामा नये, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर केला.
-
आम्ही राज्यपाल हटवण्यासाठी काही अवधी दिला आहे. त्या काळात काही घडलं नाहीतर आम्ही भूमिका घेणार आहोत. महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देणारच आहो, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
-
राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे.
-
मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे.
-
मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं नाही चालणार, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
-
महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
-
आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्ती…”, उद्धव ठाकरेंचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे म्हणतात, “राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे…”
Web Title: Uddhav thackeray attacks governor bhagatsingh koshyari over chhatrapati shivaji maharaj ssa