-
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज ( ५ नोव्हेंबर ) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये मतदान केलं.
-
मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या झंझावाती प्रचारावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.
-
भाजपाने गुजरातची निवडणूक कोणत्याही प्रचाराविना जिंकायली हवी होती. मात्र, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा गुजरातमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून बसावं लागलं. यामुळे निकाल काय लागेल सांगून शकत नाही.
-
तसेच, मशीनमध्ये गडबड करून किती गडबड करणार. लोकांचा निवडणूक यंत्रणेवर विश्वास राहिला नाही, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
-
गुजरातमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री प्रचार करत असल्याचं दोन महिन्यांपासून पाहत आहे. पंतप्रधान आपला पूर्णवेळ गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी देत आहेत.
-
गुजरातमध्ये तीन वेळा भाजपाची सत्ता असूनही प्रचारासाठी पंतप्रधानांना का यावं लागत आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
-
गुजरात तुम्ही बनवला आहे, असं म्हणता तरी आजही तुम्हाला प्रचाराला उतरावं लागतलं.
-
कोणत्याही प्रचाराविना निवडणूक जिंकायला हवी होती. परंतु, तशी परिस्थिती नाही, याची कल्पना तुम्हाला आहे.
-
त्यामुळे प्रचारासाठी एवढा घाम गाळावा लागत आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
“गुजरातचा निकाल सांगू शकत नाही, पण मशीनमध्ये…”, संजय राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप
“गुजरातमध्ये तीन वेळा भाजपाची सत्ता असूनही…”, असा टोलाही राऊतांनी लगावला
Web Title: Sanjay raut allegation bjp over gujarat election polling machine ssa