• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • राज ठाकरे
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sanjay raut replied to bjp shinde group objection on namard word spb

‘षंढ-नामर्द’ शब्दांवर भाजपाचा आक्षेप; संजय राऊतांचेही सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “मराठी भाषेविषयी मला…”

शिंदे सरकार षंढ आणि नामर्द आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. राऊतांच्या टीकेवर भाजपा-शिंदे गटाने आक्षेप घेत, संजय राऊतांना असं बोलणं शोभत नाही म्हटले होते. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: December 7, 2022 18:58 IST
Follow Us
  • संजय राऊतांनी सीमावादाच्या मुद्यावरून बोलताना शिंदे सरकार षंढ आणि नामर्द आहे, अशी टीका केली होती.
    1/12

    संजय राऊतांनी सीमावादाच्या मुद्यावरून बोलताना शिंदे सरकार षंढ आणि नामर्द आहे, अशी टीका केली होती.

  • 2/12

    राऊतांच्या टीकेवर भाजपा-शिंदे गटाने आक्षेप घेतला होता.संजय राऊतांना असं बोलणं शोभत नाही, जेलमध्ये राहल्याने इतर कैद्याकडून त्यांनी ही भाषा शिकली असावी, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. तर संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असं शंभूराज देसाई म्हणाले होते.

  • 3/12

    दरम्यान, भाजपा आणि शिंदे गटाच्या आक्षेपानंतर संजय राऊतांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

  • 4/12

    “मला भाषेविषयी कोणी सांगू नये. मला भाषा चांगली माहिती आहे. मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि ती मला उत्तम प्रकारे येते.”

  • 5/12

    “कोणते शब्द कधी वापरायचे हे मला चांगलं कळतं. षंढ शब्द मी रोज वापरत नाही. हा शब्द असंसदीय आहे असं मला वाटत नाही.”

  • 6/12

    “षंढ शब्द संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीत वारंवार वापरला गेला आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या बाबतीत लढ्याचे प्रसंग येतात, तेव्हा हा शब्द वापरला गेला आहे”, अशी प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.

  • 7/12

    “सीमाप्रश्नी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. आज महाराष्ट्रात येऊन आम्हाला आव्हान दिलं जात आहे. हे यापूर्वी कधीही झालं नाही. काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना घरातून फरफटत नेण्यात आलं, तरीही आपलं सरकार गप्प आहे. किंबहूना बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव व्हावा, यासाठी भाजपाने कंबर कसली होती. ”

  • 8/12

    “महाराष्ट्र एकीकरण समिती फोडण्याचा प्रयत्न भाजपाने केला होता, तरीही आम्ही गप्प बसलो, तर आम्ही सर्व षंढ ठरू” , अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

  • 9/12

    पुढे शरद पवारांच्या अल्टिमेटमबाबत बोलताना, “सीमाप्रश्न हा एका राजकीय पक्षाचा विषय नाही. यावर सर्वपक्षीय भूमिका घेण्याची गरज आहे. यापूर्वी सीमाप्रश्नावर जी समिती स्थापन झाली होती, त्यात सर्वपक्षीय लोकं होते.”

  • 10/12

    “त्यामुळे हा राजकीय अभिनिवेशाचा प्रश्न नाही, याचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी केले पाहिजे, आणि आता महाराष्ट्रात शरद पवारांशिवाय दुसरं कोणीही वरिष्ठ नाही.”

  • 11/12

    “त्यांनी बेळगावात जाऊन आंदोलने केली आहेत. त्यामुळे शरद पवारांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली असेल तर त्यांच्यामागे महाराष्ट्र ठामपणे उभा असेल” , अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • 12/12

    “उद्धव ठाकरेंबरोबर आता जी लोकं आहोत. ही न झुकनारी लोकं आहेत. पळपुटे आणि स्वार्थी लोकं सोडून गेले. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्रासाठी पुन्हा तुरुगांत जायची वेळ आली तर ती आमच्यासाठी गर्वाची गोष्ट असेल” , असेही ते म्हणाले.

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Sanjay raut replied to bjp shinde group objection on namard word spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.