• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. raj thackeray warns karnataka chief minister bommai in mns style msr

PHOTOS : ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका’ – राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मनसे स्टाईलने इशारा!

पाहा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज ठाकरेंनी आणखी सुनावलं आहे.

Updated: December 7, 2022 20:34 IST
Follow Us
  • राज ठाकरे म्हणाले, ‘कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय.’ (सर्व फोटो-संग्रहित)
    1/15

    राज ठाकरे म्हणाले, ‘कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय.’ (सर्व फोटो-संग्रहित)

  • 2/15

    ‘महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.’

  • 3/15

    ‘महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत.’

  • 4/15

    ‘तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं.’

  • 5/15

    ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये.’

  • 6/15

    ‘जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे.’

  • 7/15

    ‘गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका.’

  • 8/15

    ‘येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय.’

  • 9/15

    ‘माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.’

  • 10/15

    ‘अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही.’

  • 11/15

    ‘मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं.’

  • 12/15

    ‘केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.’

  • 13/15

    ‘मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे.’

  • 14/15

    ‘पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे.’

  • 15/15

    ‘थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.’

TOPICS
कर्नाटकKarnatakaमनसेMNSमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra Politicsमहाराष्ट्र सरकारMaharashtra Governmentराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Raj thackeray warns karnataka chief minister bommai in mns style msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.