• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aaditya thackeray attacks eknath shinde govt over mumbai corporation road tender ssa

Photos : “….तर मुंबई महापालिकेची FD तोडावी लागेल”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

“निवडणुका आल्याने मुंबईकऱ्यांच्या डोळ्यात…”

January 13, 2023 21:04 IST
Follow Us
  • शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्त्यांच्या कामांवरून शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. पाच हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे.
    1/12

    शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील रस्त्यांच्या कामांवरून शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खोके सरकारने मुंबई महापालिकेची लूट सुरू केली आहे. पाच हजार रस्त्यांचं कोटींचं टेंडर ही धुळफेक आहे.

  • 2/12

    “४०० किलोमीटर रस्त्यांसाठी ६ हजार ८० कोटी रुपयांचं टेंडर काढलं आहे. १ ऑगस्ट ते १ मे दरम्यान मुंबईतील रस्त्यांची काम केली जाता. मग, फेब्रुवारीत कंत्राट निघालं तर रस्त्यांची काम कधी होणार?,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

  • 3/12

    “निवडणुका आल्याने मुंबईकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत काहीही जाहीर करायचं. १९९६ ला सत्ता आली तेव्हा मुंबई महापालिका तोट्यात होती.”

  • 4/12

    “पण, २५ वर्षे काम करुन मुंबईकरांचा पैसा जपून, सोयी-सुविधा देत मुंबई पालिकेला नफ्यात आणलं. त्यामुळे देशाचं लक्ष मुंबई महापालिकेवर आहे.”

  • 5/12

    “आता अशीच काम होत असेल तर मुंबई महापालिकेची एफडी तोडावी लागेल,” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी खडेबोल सुनावले आहेत.

  • 6/12

    “ठाणे आणि अन्य महापालिका तोट्यात आहे. तसे मुंबईपालिका खोके सरकारमुळे तोट्यात जाईल.”

  • 7/12

    “या सगळ्या गोष्टी घडत असताना ४८ टक्के फायदा कंत्राटदारांना करून देण्यात आला आहे.

  • 8/12

    “महापालिकेत कोणतीही महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकांनी ही कामं मंजूर कशी केली,” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

  • 9/12

    “कंत्राटांची खिरापत वाटण्यात आली, तो पैसा मुंबईकरांच्या खिशातला आहे. कामाची समज नसतानाही कंत्राट काढण्यात आली.”

  • 10/12

    “मुंबई सगळीकडे क्राँक्रिटचे रस्ते करायचे हे कुठून सुचलं.”

  • 11/12

    “मुख्यमंत्र्यांना वाटतं दोन वर्षात मुंबईतील रस्ते सिमेंट-क्राँक्रिट होऊ शकतात, मग ठाणे, कल्याण-डोबिंवली, नवी मुंबईतील गल्लीत चांगले रस्ते का नाही झाले.”

  • 12/12

    “मग प्रत्येकवेळी मुंबईवर राग काढायचा, पैसे लुटायचं,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Sena

Web Title: Aaditya thackeray attacks eknath shinde govt over mumbai corporation road tender ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.